Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

समता जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी गायकवाड

राहाता :  समता जयंती उत्सव समिती, खडकेवाके गावातील अध्यक्षपदी संदेश गायकवाड यांची सर्वांचे एक मताने निवड करण्यात आली. सर्व भीमसैनिकाची बैठक आयोजि

‘संत ज्ञानेश्वर’च्या विद्यार्थ्यांची शिर्डी विमानतळास भेट
कोपरगाव नगरपरिषदेस १ कोटींचे अनुदान : संधान
आम्ही विकासाचे राजकारण करतो : आ. काळे

राहाता :  समता जयंती उत्सव समिती, खडकेवाके गावातील अध्यक्षपदी संदेश गायकवाड यांची सर्वांचे एक मताने निवड करण्यात आली. सर्व भीमसैनिकाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या मध्ये हा निर्णय घेण्यात आला.  प्रत्येक वर्षी नवीन युवकांना जयंतीचे आयोजन करण्याची संधी मिळावी या उपक्रमाने ही संधी चालू वर्षी संदेश यांना देण्यात आली. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती प्रत्येक वर्षी मोठ्या धूम धडाक्यात करण्यात येते.

जयंती साठी कायम पुढाकार घेणारे व सामाजिक कामात आवड असणारे संदेश गायकवाड यांना जयंती अध्यक्षपदाचा मान मिळाला असून तसेच उपाध्यक्ष रवींद्र गायकवाड व खजिनदार प्रवीण गायकवाड यांना संधी मिळाली असून

यावेळी मीटिंग मध्ये जीवन गायकवाड यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक व महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा गावात बसवावा अशी भावना व्यक्त केली.

याबाबत ग्रामपंचायतला समितीच्या वतीने उपसरपंच दीपक गायकवाड, रावसाहेब लावारे यांना निवेदन देण्यात आले. ग्रामपंचायतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसविणे कामी परवानगी देण्यात यावी व जागा उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली.या वेळी संदेश गायकवाड, प्रवीण गायकवाड, भीमशक्ती जिल्हा उपाध्यक्ष अनिल गायकवाड, जीवन गायकवाड,रामनाथ गायकवाड, बाबासाहेब गायकवाड, संतोष गायकवाड आदी उपस्थित होते.

COMMENTS