गडकरींची तुलना थेट शिवाजी महाराजांशी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गडकरींची तुलना थेट शिवाजी महाराजांशी

राज्यपालांची जीभ पुन्हा घसरली ; राज्यभरातून संताप

औरंगाबाद प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल पद स्वीकारल्यापासून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी(Bhagat Singh Koshyari) यांची वादग्रस्त वक्तव्याची माल

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी रुजविलेली स्वातंत्र्य, समता, बंधुता ही तत्त्वे सर्वव्यापी – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी 
राज्यात राज्यपाल बदलाचे वारे
मातंग समाजाच्या प्रगतीतून आणखी महापुरुष निर्माण होतील – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

औरंगाबाद प्रतिनिधी – महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल पद स्वीकारल्यापासून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी(Bhagat Singh Koshyari) यांची वादग्रस्त वक्तव्याची मालिका सुरुच असून, शनिवारी त्यांनी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराजांसोबत केल्यामुळे नवे वादंग निर्माण झाले आहे. शिवरायप्रेमींकडून राज्यपाल कोश्यारी यांचा निषेध करत संताप व्यक्त करण्यात येत आहे. औरंगाबाद येथे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि नितीन गडकरी यांना मराठवाडा विद्यापीठाकडून डि.लिट पदवी देण्यात आली. यावेळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी बोलत होते.
यावेळी बोलतांना भगतसिंग कोश्यारी यांनी नितीन गडकरी यांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केली. छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या काळातील आदर्श होते. तर नितीन गडकरी हे सध्याचे आदर्श आहेत, असं विधान करून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी वादाला फोडणी दिली आहे. ते म्हणाले की, तुम्हाला कुणी विचारलं की तुमचे हिरो कोण आहेत? तर बाहेर कुठे जायची गरज नाही. इथेच महाराष्ट्रात तुम्हाला ते मिळतील. शिवाजी तर जुन्या काळातले आहेत, मी नव्या युगाविषयी बोलतोय. डॉक्टर आंबेडकरांपासून डॉ. नितीन गडकरींपर्यंत तुम्हाला ते इथेच मिळतील. असे कोश्यारी म्हणाले. भगतसिंग कोश्यारी यांच्या या विधानाचा राज्यभरातून निषेध होत आहे. आजच्या नेत्यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करणे चुकीचे असल्याचे बोलले जात आहे. यापूर्वीदेखील छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल राज्यपाल कोश्यारी वादग्रस्त बोलले होते. महाराजा, चक्रवर्ती सगळे झाले. चाणक्याशिवाय चंद्रगुप्ताला कोण विचारेल, समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारेल? मी शिवाजी किंवा चंद्रगुप्त यांना लहान दाखवत नाही. प्रत्येकाच्या मागे आईचे मोठे योगदान असते, तसंच आपल्या समाजात गुरूचे मोठे स्थान असते. शिवाजी महाराजांनी समर्थांना म्हटले की तुमच्या कृपेने मला राज्य मिळाले आहे. या विधानावरुनही राज्यात गदारोळ झाला होता.
दरम्यान, भगतसिंह कोश्यारी यांनी सावित्रीबाई फुले यांच्याबाबतही केलेल्या वक्तव्यामुळेही वाद निर्माण झाला होता. त्यावेळी त्यांनी म्हटले होते की, सावित्री बाईंचे लग्न दहाव्या वर्षी झाले, तेव्हा त्यांच्या पतीचे वय हे 13 वर्ष होते. कल्पना करा ही लहान मुलगा मुलगी लग्नानंतर काय करत असतील? लग्न झाल्यानंतर काय विचार करत असतील? असे वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर राज्यापालांवर टीकेची झोड उठली होती.

राज्यपालांना महाराष्ट्राबाहेर पाठवा – छत्रपती संभाजीराजे

राज्यपाल कोश्यारी यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. राज्यपालांना महाराष्ट्राबाहेर काढा, असे त्यांनी म्हटले आहे. राज्यपाल भगत सिंग कोश्यारी सातत्याने अशी बडबड का करतात असा मला प्रश्‍न पडला आहे. मी म्हणतो यांना महाराष्ट्राच्या बाहेर काढा. माझी पंतप्रधान नरेंद्र मोदींना हात जोडून विनंती आहे की अशी व्यक्ती महाराष्ट्रात आम्हाला नको आहे, असे संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटले आहे.

COMMENTS