नाशिक : नाशिक जिल्हा परिषद व जिल्ह्यातील 15 पंचायत समितीतील १०४८० प्राथमिक शिक्षक, मुख्याध्यापक,पदवीधर शिक्षक व केंद्र प्रमुख यांचे ऑगस्ट महिन्या
नाशिक : नाशिक जिल्हा परिषद व जिल्ह्यातील 15 पंचायत समितीतील १०४८० प्राथमिक शिक्षक, मुख्याध्यापक,पदवीधर शिक्षक व केंद्र प्रमुख यांचे ऑगस्ट महिन्याचे वेतन रुपये 92.52 कोटी आज दि. 1 सप्टेंबर रोजी वितरीत करण्यात आले. त्याचबरोबर ७५४७ सेवानिवृत्त वेतन धारक शिक्षकांचे सेवानिवृत्ती वेतन रुपये 22.38 कोटी असे एकूण ११४.९ कोटी रुपयांचे वेतन व सेवा निवृत्ती वेतन झेडपीएफएमएस प्रणालीद्वारे जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने शुक्रवार दि. 1 सप्टेंबर रोजी पंचायत समिती गट विकास अधिकारी यांना वितरीत करण्यात आले. जुलै महिन्यापासून वेतन व सेवा निवृत्तीवेतन हे वेळेत अदा करण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी सर्व विभागांना दिले होते, त्यानुषंगाने सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी स्वतः सर्व तालुक्यातील गट विकास अधिकारी यांच्याशी संपर्क साधून शिक्षक व सेवानिवृत्ती वेतन धारकांचे वेतन 22.38 कोटी तर ४११४ जिल्हा परिषद सेवा निवृत्त कर्मचारी यांचे निवृत्तीवेतन 9.35 कोटी हे त्वरित वितरीत करण्याबाबत सूचना केल्या.
शिक्षक संचालक कार्यालय पुणे यांच्या वतीने दि. 21 रोजी सायंकाळी वेतन व सेवानिवृत्ती वेतनाबाबत अनुदान प्राप्त झाले, त्यानुषंगाने शिक्षण विभागाने तातडीने देयके तयार करून दि. 22 रोजी वित्त विभागास सादर केली, वित्त विभागाच्या वतीने सर्व देयके तपासून 23 ऑगस्ट रोजी जिल्हा कोषागार कार्यालयात देयके सदर करण्यात आली. दि. 29 ऑगस्ट रोजी सीएमपी प्रणालीद्वारे एसबीआय बँकेच्या वतीने वेतन व निवृत्तीवेतन निधी जिल्ह्यातील सर्व गट विकास अधिकारी यांना वितरीत करण्यात आला. सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी हा निधी वितरीत झाल्याबाबत सर्व तालुक्यातील गट विकास अधिकारी यांना अवगत करून शिक्षकांचे वेतन व सेवानिवृत्ती वेतन अदा करण्याबाबत सूचना केल्या, कळवण तालुक्यातील निवृत्तीवेतन जमा होण्यासाठी तांत्रिक अडचणी आल्या होत्या त्यादेखील तात्काळ सोडवून लवकरात लवकर सेवानिवृत्ती वेतन जमा करण्याच्या सूचना संबधितांना दिल्या. जिल्हा परिषदेतील सेवानिवृत्त कर्मचारी यांचे 9.35 कोटी रुपये निवृत्ती व कुटुंब निवृत्ती वेतन हे देखील आज रोजी त्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले.
याकामी शिक्षण विभागातील कनिष्ठ सहायक दिनेश कुलकर्णी, वरिष्ठ सहायक प्रशांत ब-हानपुरकर, कनिष्ठ लेखाधिकारी विजय जगदाळे, उपशिक्षणाधिकारी भास्कर कनोज, शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव यांचे समवेत वित्त विभागातील वरिष्ठ सहायक लेखा रामेश्वर बादड, विश्वजित कासारे, मंगेश जगताप, कनिष्ठ लेखाधिकारी पूनम भांबरे,सहायक लेखाधिकारी रमेश जोंधळे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी भालचंद्र चव्हाण सामान्य प्रशासन विभागातील कनिष्ठ सहायक ललिता मोंढे, कनिष्ठ प्रशासन अधिकारी सोनाली भार्गवे, सहायक प्रशासन अधिकारी रवींद्र आंधळे, जिल्हा कोषागार कार्यालयातील वरिष्ठ जिल्हा कोषागार अधिकारी महेश बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर कोषागार अधिकारी ज्योती गायकवाड, उप कोषागार अधिकारी अशोक घुमरे, लेखा लिपिक अर्जुन साबळे यांनी कामकाज केले.
COMMENTS