Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जि.प. सुपर ५० उपक्रम अंतर्गत जेईई ऍडव्हान्स परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान

आयआयटी, एनआयटी, ट्रिपलआयटीत जाण्याचे स्वप्न झाले साकार 7 विद्यार्थ्यांची झाली निवड

नाशिक: नाशिक जिल्हा परिषदेच्या वतीने सन २०२२ मध्ये सुपर ५० हा नावीन्यपूर्ण उपक्रम सुरू करण्यात आला होता. या उपक्रमांतर्गत सन २०२२ ते २०२४ या शैक्

 गोंदिया जिल्ह्यात आज 4 कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मतदानाला सुरुवात
ब्राह्मण समाज प्रतिनिधी-शरद पवार भेटीचा अन्वयार्थ !
जिहे कठापूरचा समावेश पीएमकेएसवायमध्ये व्हावा; आ. जयकुमार गोरे यांची केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाकडे मागणी

नाशिक: नाशिक जिल्हा परिषदेच्या वतीने सन २०२२ मध्ये सुपर ५० हा नावीन्यपूर्ण उपक्रम सुरू करण्यात आला होता. या उपक्रमांतर्गत सन २०२२ ते २०२४ या शैक्षणिक वर्षात अनुसूचित जाती अनुसूचित जमाती प्रवर्गातील ५० विद्यार्थ्यांना जेईई, सीईटी व जेईई ॲडव्हान्स परीक्षांचे परीक्षांसाठी निवास स्वरूपाचे प्रशिक्षण हे देण्यात आले. सलग दोन वर्षाच्या निवासी स्वरूपाच्या अभ्यासक्रमानंतर ५० विद्यार्थ्यांपैकी २२ विद्यार्थ्यांनी जेईई मेन्स परीक्षा उत्तीर्ण होऊन सदर विद्यार्थ्यांनी दि. २६ मे रोजी जेईई ऍडव्हान्स परीक्षा दिली होती. यापैकी ७ विद्यार्थी हे जेईई ऍडव्हान्स परीक्षा उत्तीर्ण झाले. जिल्ह्याचे ना. पालकमंत्री दादाजी भुसे यांनी आज विद्यार्थ्यांशी संवाद साधत या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. 

सुपर ५० उपक्रम २०२२ च्या बॅचची नुकतीच सांगता झाली या बॅचमधील २२ विद्यार्थ्यांनी जेईई मेन्स परीक्षा उत्तीर्ण होत जेईई ऍडव्हान्स परीक्षा दिली होती. यातील अश्विनी सुभाष बोरसे (AIR ९६८), डिंपल अशोक बागूल (AIR  १०१०), हर्षदा संजय वाटणे(AIR २२६३), आकांक्षा विनोद शेजवळ(AIR २९९३), मंगेश कृष्णा इमपाळ(AIR ३०४२), सागर मनोहर जाधव(AIR ३०४७), वृषाली जनार्दन वाघमारे (AIR ६१८९)  या विद्यार्थ्यांनी जेईई ऍडव्हान्स परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. यामुळे आता विद्यार्थ्यांचे आयआयटी, एनआयटी, ट्रिपलआयटीत जाण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. 

पालकमंत्री दादाजी भुसे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्यात यावेळी खा. शोभा बच्छाव, खा. माणिकराव कोकाटे, खा. भास्कर भगरे, आ. सीमा हिरे, आ. माणिकराव कोकाटे, आ. राहुल आहेर, आ. नितीन पवार, आ. हिरामण खोसकर तसेच जिल्हा नियोजन समितीचे सदस्य, जिल्हाधिकारी , महापालिका आयुक्त, पोलीस अधीक्षक आदि. मान्यवर उपस्थित होते.

COMMENTS