Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती!; खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती

नांदेड : नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्ग प्रकल्पाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती मिळणार असल्याची माहिती माजी मुख्यमंत्री व राज्यसभेचे खासदार अशोकर

उर्सात बनावट नोटा चालविण्याचा प्रयत्न फसला; 19 हजार 500 रुपयांच्या नोटा जप्त
जिल्ह्यात आठवडाभर पुरेल एवढाच गॅसचा साठा!व्यावसायिक गॅसचा तुटवडा; खानावळी, हॉटेलचालक  संकटात, विद्यार्थ्यांच्या जेवणावर प्रश्नचिन्ह
युद्धजन्य परिस्थितीमुळे नांदेड शहरांमध्ये हॉटेल, वस्तीगृहे यामध्ये व्यावसायिक सिलेंडरचा तुटवडा; विद्यार्थी संख्येवर परिणाम होण्याची शक्यता

नांदेड : नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्ग प्रकल्पाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती मिळणार असल्याची माहिती माजी मुख्यमंत्री व राज्यसभेचे खासदार अशोकराव चव्हाण यांनी दिली आहे.
त्यांनी आज समाजमाध्यमांवर प्रतिक्रिया देत हे सूतोवाच केले. सदर माहितीला मराठवाड्यासाठी आनंदाच्या बातमीची उपमा देत आपल्या पोस्टमध्ये खा. अशोकराव चव्हाण यांनी नमूद केले आहे की, नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्ग प्रकल्पाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती मिळणार असल्याचे शुभसंकेत आहेत. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी यासंदर्भात माझी मागील काही महिन्यात अनेकदा चर्चा झाली. काही दिवसांपूर्वीच त्यांनी पुन्हा या विषयावर सविस्तर माहिती जाणून घेतली. त्यानंतर राज्यसभेतही मी हा विषय पुन्हा विस्तृतपणे मांडला. गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या या पाठपुराव्याला यश येत असून, प्रकल्पाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच सुरुवात होणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे खा. अशोकराव चव्हाण यांनी असेही नमूद केले आहे की, मी पालकमंत्री असताना ’महारेल’च्या माध्यमातून नांदेड-लातूर नवीन रेल्वे मार्गाच्या प्रकल्पाचा प्राथमिक अहवाल तयार करून घेतला होता. त्यानंतर विधानसभेत पाठपुरावा करून हा प्रस्ताव राज्य सरकारमार्फत केंद्र सरकारकडे पाठवला होता. त्यानुसार रेल्वे मंत्रालयाने ’फायनल लोकेशन सर्व्हे’ पूर्ण केला आहे. नांदेड-लातूर हा केवळ मराठवाड्यातील दोन शहरांना जोडणारा मार्ग नसून, विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राला जवळ आणणारा एक महत्त्वाचा दुवा ठरणार आहे. पूर्वीपासूनच निर्माणाधीन असलेला वर्धा-यवतमाळ-नांदेड आणि नांदेड-लातूर हा नवीन प्रकल्प पूर्ण झाल्यावर विदर्भातील नागपूर आणि पश्चिम महाराष्ट्रातील मिरज या दोन प्रमुख जंक्शनमधील अंतर तब्बल 184 किलोमीटरने कमी होईल. या महत्त्वपूर्ण प्रकल्पासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सातत्याने मोलाचे सहकार्य लाभत असल्याचा उल्लेखही त्यांनी केला आहे.

COMMENTS