Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

निलंगा बाजार समितीसाठी निधी उपलब्ध करून देणार

मदनसुरी प्रतिनिधी - केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार आहे, त्यामुळे आपणास कोणत्याही प्रकरची अडचण भासणार नाही. अपल्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे आह

कुष्ठधाम सोसायटीत फराळाचे साहित्य वाटप
गौतमी पाटीलचे सिंधुदुर्गमधील कार्यक्रम रद्द
हादगाव- निवघ्यातील अवैध धंद्यांना अभय कोणाचे ?

मदनसुरी प्रतिनिधी – केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार आहे, त्यामुळे आपणास कोणत्याही प्रकरची अडचण भासणार नाही. अपल्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे आहे. त्यामुळे सर्वांनी भाजपच्या पाठीशी उभे रहावे. निलंगा कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी भरघोस निधी उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी मदनसुरी येथे निलंगा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या अनुसंगाने मतदारांच्या आयोजित बैठकीत मार्गदर्शन करताना दिले.
यावेळी अरिंवद पाटील निलंगेकर, जिल्हा सरचिटणीस संघटक संजय दोरवे, जिल्हा उपाध्यक्ष शेषेराव ममाळे, माजी उप सभापती श्रीमंत म्हेकरे, चेअरमन दयानंद मुळे, अनिल कामले, माजी सरपंच गोविंद गोडबोले, संजय उजणें, परिसरातील सरपंच व चेअरमन यांची उपस्थिती होती. यावेळी पाटील म्हणाले की, शेतक-यांच्या शेतीमालास लातूरला जो भाव दिला जाईल तोच भाव आपण निलंगा येथे शेतक-यास दिला जाईल ,एक पारदर्शक कृषि उत्पन्न बाजार समिती बनविण्याचा प्रयत्न असणार आहे. 20 वर्षापूर्वी राजकारणात आमदार निलंगेकराचे रोप आपण लावले आहे आणि आता तुमची सेवा करणे हेच आमच्या घराणेशाहीचे संस्कार आहेत. पोकळ आश्वासन देऊन कांहीतरी कृतीतून करुन दाखविण्याची धमक कोणाकडे आहे हे मतदारांनी पाहावे. खोट्या भूलथापांना बळी पडू नका. शेतक-यांच्या ऊसाला चांगला भाव देणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. अरिंवद दिलीपराव पाटील निलंगेकर शेतकरी विकास पॅनलला सुजान मतदारांनी सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले.

COMMENTS