Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मोरगिरी विकास सोसायटीत माजी मंत्र्याच्या पॅनेलकडून विद्यमान मंत्र्यांच्या पॅनेलचा धुरळा

मोरगिरी ग्रुप विकास सेवा सोसायटीत निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केल्यानंतर नवनिर्वाचित संचालक व कार्यकर्ते यांचा सत्कार करताना सातारा जिल्हा मध्यवर्ती

स्व. एन. डी. पाटील यांच्या स्वप्नांच्या आड येणार्‍यांना धडा शिकवा : निशिकांत भोसले-पाटील
कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत गेल्यास पुन्हा लॉकडाऊन : उपमुख्यमंत्री
तुळसण येथे बिबट्या दुचाकीच्या आडवा : चालक जखमी

पाटण / प्रतिनिधी : राज्याचे गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या मोरणा बालेकिल्ल्यातील व पाटण तालुक्यातील मोठी विकास सोसायटी असलेल्या मोरगिरी ग्रुप विकास सोसायटी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत पाटणकर गटाच्या पॅनेलने या सोसायटीच्या निवडणुक झालेल्या सर्वच्या सर्व बारा जागांवर बहुमताने विजय मिळवला.
पाटण तालुक्यात मोठी तब्बल सोळाहून अधिक गावे व अठराशेहून अधिक मतदान असलेल्या व ना. शंभूराज देसाई गटाच्या मोरगिरी तथा मोरणा या प्रमुख बालेकिल्ल्यातील या सोसायटीची नुकतीच निवडणूक झाली. यामध्ये पाटणकर गट तथा राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनलचे सर्व उमेदवार निवडून आले. सर्वसाधारण मधून तानाजी कदम, सुरेश गालवे, दगडू बाबर, रमेश माने, नथुराम मोरे, सिताराम मोरे, हरिबा मोरे, प्रताप सुर्वे, महिलांमधून सौ. अनिता पवार, सौ. संगीता मोरे, इतर मागासवर्गीय संजय पुजारी, मागासवर्गीय मधून प्रकाश प्रभाळे हे बारा उमेदवार सरासरी सव्वादोनशे ते अडिचशे मताधिक्याने निवडून आले. ना. देसाई गटाला यापूर्वी झालेल्या बिनविरोध निवडीत केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले. भटक्या विमुक्त जातींमधून युवराज चव्हाण यांची बिनविरोध निवड झाली. निवडीनंतर नवनिर्वाचित संचालक मंडळाचा माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर व राष्ट्रवादीचे नेते सत्यजितसिंह पाटणकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
नवनिर्वाचित संचालकांचे माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, सत्यजितसिंह पाटणकर, पंचायत समिती सभापती राजाभाऊ शेलार, उपसभापती प्रतापराव देसाई, जिल्हा परिषद माजी शिक्षण व अर्थ समिती सभापती राजेश पवार, पाटण अर्बन बँक चेअरमन बाळासो राजेमहाडिक, तालुका दूध संघ चेअरमन सुभाषराव पवार, कोयना शिक्षण संस्था अध्यक्ष डॉ. सोपानराव चव्हाण, सचिव अमरसिंह पाटणकर, खरेदी-विक्री संघ चेअरमन अ‍ॅड. अविनाश जानुगडे, बाजार समिती सभापती रेखाताई पाटील यांच्यासह मान्यवर पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतकांनी अभिनंदन केले.

COMMENTS