Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

स्वातंत्र्यसेनानी भाऊसाहेब थोरात समाजविकासाचे कृतिशील संत; मल्हार अरणकल्ले ; अमृत उद्योग समूहाच्या वतीने अभिवादन

संगमनेर : वयाच्या १९ व्या वर्षी स्वातंत्र्यसंग्रामात उडी घेणाऱ्या भाऊसाहेब थोरात यांनी आयुष्यभर शब्दांचा पक्केपणा आणि मनाचा सच्चेपणा जपला. स्वातं

कोसळली टाकी एक, पण प्रश्न अनेक ! कोपरगाव तालुक्यातील टाक्यांच्या संख्येबाबत पंचायत समिती प्रशासन अनभिज्ञ
गौतम पॉलिटेक्निकमध्ये रोबो विश्व रोबोटिक्स क्लबचे उद्घाटन
श्रीगोंद्यात भर रस्त्यात गॅस सिलेंडर वितरण; नागरिकांची कोंडी, सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

संगमनेर : वयाच्या १९ व्या वर्षी स्वातंत्र्यसंग्रामात उडी घेणाऱ्या भाऊसाहेब थोरात यांनी आयुष्यभर शब्दांचा पक्केपणा आणि मनाचा सच्चेपणा जपला. स्वातंत्र्यसंग्राम, सर्वसामान्यांसाठी तळमळ, आंदोलने चळवळी, मोर्चे याचबरोबर तालुक्याच्या विकासाची पायाभरणी करताना त्यांनी सामान्य माणसाच्या विकासासाठी आयुष्य समर्पित केले. वयाच्या 84 व्या वर्षी दंडकारण्य अभियान देणारे स्वातंत्र्यसेनानी भाऊसाहेब थोरात समाज विकासासाठी आयुष्यभर झटणारे कृतीशील संत असल्याचे गौरवोद्गार ज्येष्ठ साहित्यिक मल्हार अरणकल्ले यांनी काढले आहे.

अमृत उद्योग समूहाच्या वतीने 16 व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त कारखाना कार्यस्थळावरील प्रेरणास्थळ येथे सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी मा.आ.डॉ.सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, ऍड.माधवराव कानवडे, कारखान्याचे व्हाईस चेअरमन पांडुरंग घुले, दुर्गाताई तांबे,डॉ.जयश्री थोरात, अमेय प्रकाशाचे उल्हास लाटकर, रणजीतसिंह देशमुख, संपतराव डोंगरे, लक्ष्मणराव कुटे यांच्यासह अमृत उद्योग समूहातील विविध संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना मल्हार अरणकल्ले म्हणाले की, वयाच्या 19 व्या वर्षी भाऊसाहेब थोरात यांनी स्वातंत्र्यसंग्रामात उडी घेतली. डॉ.अण्णासाहेब शिंदे यांचे संस्कार त्यांच्यावर झाले. सर्वसामान्यांच्या विकासाचा ध्यास त्यांनी घेतला आणि त्यासाठी आयुष्य समर्पित केले. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सहकार, शेती,शिक्षण, दूध व्यवसाय यामधून समृद्ध तालुका घडवला.

 संघर्ष,लढे,चळवळी,प्रखर ध्येयवाद, राष्ट्रवाद त्यांनी आयुष्यभर जपला. प्रत्येक कामात समर्पण केले. संगमनेर तालुक्याच्या हक्काच्या 30 टक्के पाण्यासाठी मोठा लढा दिला. याचबरोबर रिझर्व बँकेवर मोठा मोर्चा काढला. स्वतःच्या सरकार विरोधात मोर्चा काढणारे ते जनसामान्यांसाठी लढणारे नेते होते.

तर माजी आ.डॉ.तांबे म्हणाले की, दुष्काळी तालुका ते विकसित तालुका हा सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या दूरदृष्टीतून निर्माण झाला. नैतिकता हा त्यांच्या कार्याचा पाया आहे. नैतिकतेवर आधारित संगमनेरचा सहकार असल्यामुळे तो आज देशाला दिशादर्शक ठरत आहे.  या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन पांडुरंग  घुले यांनी केले. यावेळी अमृत उद्योग समूहातील विविध संस्थांचे पदाधिकारी अधिकारी कार्यकर्ते शेतकरी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS