Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सैन्यदल अधिकारी पदाच्या परीक्षेसाठी मोफत पूर्वप्रशिक्षण

छत्रपती संभाजीनगर : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमदेवारांसाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड,

पोलिस कारवाईनंतरही कोतुळमध्ये मटका सुरूच
मराठा आरक्षणासाठी तरूणाची आत्महत्या
 कांद्याचे दर घसरल्याने शेतकरी हवालदिल 

छत्रपती संभाजीनगर : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमदेवारांसाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे मोफत प्रशिक्षणाची सुविधा करण्यात येते. येत्यादि.५ ते १४ मे या कालावधीत याबाबतचे प्रशिक्षण क्रमांक ६१ चे आयोजन करण्यात येत आहे. या प्रशिक्षणात प्रशिक्षणार्थ्यांची निवास व भोजन व्यवस्था निः शुल्क करण्यात येते. या संधीचा लाभ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे दि.३ मे रोजी मुलाखतीस हजर रहावे. मुलाखतीस येते वेळी त्यांनी सैनिक कल्याण विभागाच्या www.mhasainik.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन (Other – PCTC Nashik SSB-61) कोर्ससाठी संबंधित या परिशिष्टांची प्रिंट काढून व ते पूर्ण भरुन सोबत घेऊन जावे. अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र नाशिक रोड, नाशिक यंचा ईमेल आयडी – [email protected] व दूरध्वनी क्र. आणि ०२५३-२४५१०३२ किंवा व्हाट्सएप क्र. ९१५६०७३३०६ वर कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा दुरध्वनीवर संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

COMMENTS