Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शरणपूर वृद्धाश्रमात तीस वृद्धांची निसर्गोपचार पध्दतीने मोफत नेत्र तपासणी

डोळ्यांची काळजी यावर वैद्य सीताराम पवार यांचे मार्गदर्शन

नेवासाफाटा/प्रतिनिधीः नेवासा खडका रस्त्यावर असलेल्या शरणपूर वृद्धाश्रमातील वृद्धांची मोफत निसर्गोपचार पद्धतीने नेत्र तपासणी करण्यात आली. बिडकीन ज

जगताप-काळे संघर्षात सेना-भाजपची उडी ; खोटे गुन्ह्यांचे प्रकार थांबवण्याची पोलिसांकडे मागणी
Ahmednagar : भाजपचा नेता आमदार रोहित पवारांच्या गोटात..राम शिंदेंना जोरदार झटका I LOK News24
एचआरसीटी माहिती लपवल्याने नगरमध्ये कोरोना रुग्ण वाढ

नेवासाफाटा/प्रतिनिधीः नेवासा खडका रस्त्यावर असलेल्या शरणपूर वृद्धाश्रमातील वृद्धांची मोफत निसर्गोपचार पद्धतीने नेत्र तपासणी करण्यात आली. बिडकीन जवळील खुडेगाव येथील जय भद्रा पारंपरिक व निसर्गोपचार केंद्राचे प्रमुख नेत्र चिकित्सक वैद्य सीताराम पवार यांनी सुमारे तीस जणांची मोफत नेत्र चिकित्सा करून यावेळी डोळ्यांची घ्यावयाची काळजी याविषयी  मोलाचे मार्गदर्शन केले.
     निसर्गोपचार पद्धतीने झालेल्या नेत्र चिकित्सा प्रसंगी वृद्धाश्रमाचे चालक रावसाहेब मगर यांनी स्वागत केले.वृद्धाश्रम कमिटीचे अध्यक्ष पत्रकार बाळासाहेब देवखिळे यांनी निसर्गोपचार पद्धतीने सीताराम पवार यांनी सुरू केलेल्या नेत्र चिकित्सा उपक्रमाचे कौतुक केले.वृद्धाश्रम कमिटीचे मार्गदर्शक पत्रकार सुधीर चव्हाण यांनी वृद्धाश्रमात लोक सहभागातून चालणार्‍या उपक्रमाची माहिती यावेळी दिली. निसर्गोपचार तज्ञ वैद्य सीताराम पवार म्हणाले की, आम्ही दर सोमवारी नेवासा येथे नेत्रचिकित्सा घेतो. निसर्गोपचार पद्धतीने उपचार करतो. त्यामुळे अनेकांचे मोतीबिंदूचे ऑपरेशन टळले असल्याचे सांगत काहींच्या चष्म्याचे नंबर गायब झाले असल्याचा दावा केला. निसर्गोपचार पद्धतीच्या नेत्र चिकित्सामुळे लहानापासून वृद्धांच्या डोळ्यांना नवसंजीवनी प्राप्त झाले असल्याचे सांगितले. या नेत्रचिकित्सासाठी नेवासाफाटा येथील जी के मंगल कार्यालयात तर नेवासा येथील लोखंडे गल्लीत आम्ही दर सोमवारी चिकित्सा करण्यासाठी येत असून, याचा गरजूंनी लाभ घ्यावा. असे आवाहन यावेळी बोलतांना केले.यावेळी सेवेकरी शिवाजी गायकवाड,आरोग्य सल्लागार भाऊसाहेब येवले,चंदूमामा घोडके,ज्योती मगर यांच्यासह वृद्धाश्रमातील आजी आजोबा मोठ्या संख्येने उपस्थित होते. वृद्धाश्रमातील सुमारे तीस जणांची मोफत आयुर्वेदिक चिकित्साद्वारे नेत्र तपासणी करण्यात आली. वृद्धाश्रमाचे व्यवस्थापक संतोष मगर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

COMMENTS