Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

स्वराज्य पक्षातर्फे महिलांना मोफत नॅपकिन बुके,राखी मेकिंग,पेपर बॅग,फॅशन डिझाईन मधील वेगवेगळे प्रशिक्षणाचे वेगवेगळ्या ठिकाणी आयोजन

  नाशिक प्रतिनिधी - स्वराज्य प्रमुख संभाजी महाराज स्वराज्य संपर्कप्रमुख तथा प्रवक्ते मा.करण भाऊ गायकर यांच्या अध्यक्षतेखाली तसेच उत्तर महाराष्ट्

ॲव्हेंजर्स एंडगेम अभिनेता जेरेमी रेनर यांचा अपघात
कांजूरमार्ग कारशेडसाठी 15 दिवसांत मागवणार निविदा
देशाच्या भवितव्यासाठी प्रत्येक नागरिकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणे काळाची गरज – समाज कल्याण आयुक्त राधाकिसन देवढे

  नाशिक प्रतिनिधी – स्वराज्य प्रमुख संभाजी महाराज स्वराज्य संपर्कप्रमुख तथा प्रवक्ते मा.करण भाऊ गायकर यांच्या अध्यक्षतेखाली तसेच उत्तर महाराष्ट्र महिला आघाडी अध्यक्ष सौ मनोरमा ताई पाटील व महाराष्ट्र कोर कमिटी सदस्य पुष्पाताई जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली स्वराज्य प्रमुख छत्रपती संभाजी महाराज यांनी दिलेल्या आदेशाने प्रत्येक स्वराज्याचा पदाधिकारी हा सक्षम झाला पाहिजे त्याने त्याचे स्वतःचे व्यवसाय उभे केले पाहिजे मधून आपल्या कुटुंब सुरक्षित करून मग स्वराज्याचे काम करायचे या माध्यमातून नाशिक जिल्ह्यामध्ये महिलांसाठी मोठ्या प्रमाणात मोफत प्रशिक्षण शिबिराचे आयोजन वेगवेगळ्या ठिकाणी केले जात आहे यामध्ये महिलाही मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन या प्रशिक्षणाचा फायदा घेत आहे. यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी राखी मेकिंग पेपर बॅग फॅशन डिझाईन नॅपकिन बुके चे प्रशिक्षण उपस्थित महिलांना उद्योजक आघाडी महानगरप्रमुख मीनाक्षीताई पाटील व नाशिक महानगरप्रमुख निशिगंधा पाटील यांनी दिले .

 विविध प्रकारच्या राख्या त्यांना या प्रशिक्षणामध्ये शिकवण्यात आल्या तसेच त्यांना व्यवसाय म्हणून राखी बनवून रोजगार प्राप्त करायचा असेल तर त्यांना होलसेल मध्ये मटेरियल कुठून भेटू शकेल कोणत्या पद्धतीने तुम्ही राखीचा व्यवसाय करू शकता याचे सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.त्याचबरोबर ज्या महिला राख्या बनवणार आहेत त्या राख्यांसाठी स्वराज्य पक्षाच्या वतीने काही महिलांना स्टॉल उभे करण्यासाठी मदत केली जाणार आहे तसेच ज्या महिला बनविल्या राख्या विकण्यासाठी इच्छुक असतील त्यांना या राख्या उपलब्ध करून दिल्या जातील सध्याच्या युगामध्ये राख्यांचे बाजारातील भाव बघतात स्वराज्य पक्षाच्या वतीने ज्या काही राख्या बनविण्यात येणार आहे ह्या अत्यंत होलसेल दरात विकण्यासाठी उपलब्ध करून दिला जाणार आहे स्वराज्याचा उद्देश एवढाच आहे महिला रोजगार निर्मिती करून महिलांना स्वावलंबी व सक्षम बनविणे त्यामुळे ह्या वेगवेगळ्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून जास्तीत जास्त महिलांनी या प्रशिक्षण शिबिराचा लाभ घेण्याच आव्हानही स्वराज्य पक्षाच्या वतीने करण्यात येत आहे.माडसांगवी,दिंडोरी,जेलरोड,नाशिक रोड,जत्रा हॉटेल आडगाव या ठिकाणी विविध प्रकारच्या घेतलेल्या प्रशिक्षणाला या विभागातील महिलांनीखूप छान प्रकारे प्रतिसाद दिला.

या प्रशिक्षणाचे आयोजन महिला आघाडी जिल्हाप्रमुख सुलक्षणाताई गवळी,जिल्हा संपर्कप्रमुख रेखाताई पाटील,जिल्हा संघटक रेखाताई जाधव,मुक्ताताई खोडे रेणुकाताई पेखले, रागिनीताई आहेर,नंदा चव्हाण,पूजाताई चव्हाणके,नेहा नाठे,काजल देवरे,श्वेता गुंजाळ त्यांनी केले होते त्यांचे मनापासून खूप खूप अभिनंदन महिलांना स्वयंरोजगार प्रशिक्षण देऊन त्यांना सक्षम करण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी मेहनत घेतली आहे इतर महिला पदाधिकाऱ्यांनी सुद्धा आपापल्या प्रभागात असेच प्रशिक्षण आयोजन करण्यासाठी प्रयत्न करावे या दोन्ही पदाधिकाऱ्यांचं स्वराज्य पक्षाच्या वतीने खूप खूप अभिनंदन. या प्रशिक्षणासाठी महिलांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली.

COMMENTS