Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

देवगांवकर हॉस्पीटलतर्फे मोफत किडनी विकार तपासणी शिबीर

नाशिक : सकाळी उठल्यावर डोळ्याभोवती सुज येणे, चेहरा किंवा पायावर सुज येणे, रक्तदाब किंवा मधुमेह यांचा किडनी विकार, तरूणपती उच्च रक्तदाब, रक्तातील

जमिनीवर बेकायदेशीर ताबा मिळवणार्‍या दादावर कारवाई करा
आरोपीने थेट पोलिस अधिकार्‍याच्या अंगावर घातली गाडी
वक्फ दुरुस्ती विधेयक अधिवेशनात मंजूर करावे : राज ठाकरे

नाशिक : सकाळी उठल्यावर डोळ्याभोवती सुज येणे, चेहरा किंवा पायावर सुज येणे, रक्तदाब किंवा मधुमेह यांचा किडनी विकार, तरूणपती उच्च रक्तदाब, रक्तातील युरिया क्रिएटिनचे प्रमाण वाढणे, लघवीत  रक्त किंवा प्रोटीन जाणे/ त्रास होणे यासारखी लक्षणे असलेल्या रूग्णांसाठी देवगांवकर हॉस्पीटलच्या वतीने सोमवार दि.१५ मे ते १९ मे २०२३ पर्यंत, दुपारी १ ते ४ या वेळेत विनामुल्य किडनी विकार तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती किडनीविकार तज्ञ डॉ. पार्थ देवगांवकर यांनी दिली.

सामाजिक हित जोपासत रूग्णसेवेचा वसा घेतलेल्या केटीएचएम कॉलेज समोरील पंडीत कॉलनीतील देवगांवकर हॉस्पीटलच्या किडनी विकार शिबिरात  सहभागी रूग्णांना नाममात्र १५०/- रूपयात सीबीसी, क्रिएटिन युरीन, ब्लड शुगर लेव्हल यासारख्या तपासण्या करण्यात येणार आहेत. या शिबिरात सहभागी होण्यासाठी दुरध्वनी क्रमांक २५७०४२४ तसेच भ्रमणध्वनी ८१०८१४९६४५ क्रमांकावर रजिस्ट्रेशन करण्याचे आवाहन हॉस्पीटलतर्फे करण्यात आले आहे.

COMMENTS