Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लायन्स व लिओ क्लब ऑफ कोपरगाव तर्फे मोफत फ्लेक्स वाटप

कोपरगाव शहर ः नेहमीच सामाजिक कार्यात आग्रेसर असणार्‍या लायन्स व लिओ क्लब कोपरगावतर्फे अनोखा म्हणजेच गरजू लोकांना फ्लेक्स वाटप कार्यक्रम घेण्यात आ

अभिनेत्यांनी हाकललेल्या लेकरावर नगरमध्ये झाली शस्त्रक्रिया
कत्तलखाने पुन्हा सुरू होणार नाही, याची खबरदारी घ्या : नगराध्यक्ष वहाडणे
ज्ञानेश्‍वर देशमुख यांच्याकडून नवे देडगाव शाळेला पुस्तके भेट

कोपरगाव शहर ः नेहमीच सामाजिक कार्यात आग्रेसर असणार्‍या लायन्स व लिओ क्लब कोपरगावतर्फे अनोखा म्हणजेच गरजू लोकांना फ्लेक्स वाटप कार्यक्रम घेण्यात आला. पावसाळा सुरू झाला असून आजही कोपरगांव शहरात अनेक लोकांना पक्के छत असलेले घर नाही त्यामुळे घर पावसाळ्यात गळू नये म्हणून त्यावर ताडपत्री स्वरूपाचे अच्छादन राहावे म्हणून गरजू लोकांना फ्लेक्स वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात लायन्स क्लबचे अध्यक्ष ड. मनोज कडू, लिओ अध्यक्ष धीरज कराचीवाला, लायन्स सहसचिव शाम जंगम आदींची भाषणे झाली. सदर कार्यक्रमाचे  आभार प्रदर्शन लायन्स सचिव कैलास नागरे यांनी केले आणि कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनस नागरे यांनी केले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी करण शाहा, हर्षल होडे, पृथ्वी शिंदे, आदित्य गुजराथी आदी सदस्यांनी योगदान दिले.

COMMENTS