नांदेड : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवण्यासाठी योग्य मार्गदर्शन मिळावे या हेतूने युवा रोजगार परिषदेचे राष्ट

नांदेड : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवण्यासाठी योग्य मार्गदर्शन मिळावे या हेतूने युवा रोजगार परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष लक्ष्मीकांत कलमूर्गे यांच्यातर्फे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राची स्थापना करण्यात येणार आहे.
स्पर्धा परीक्षा हे सरकारी नोकरी मिळवण्याचे एक साधन असून दरवर्षी साधारणपणे महाराष्ट्रात दहा लक्ष विध्यार्थी आपले नशीब विविध स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून अजमावत असतात. ग्रामीण भागातील विध्यार्थी हा गुणवत्ता असूनही उचित मार्गदर्शना अभावी या स्पर्धेत मागे पडतो. स्पर्धा परीक्षेचे स्वरूप व संधी तसेच बदलत जाणारा अभ्यासक्रम या बाबतचा परामर्श या चिंतनात घेण्याचा प्रयत्न केला आहे. स्पर्धा परीक्षा हे एक आव्हान आहे आणि ते पेलायचे असेल तर योग्य मार्गदर्शन, अचूक तयारी व त्याला कष्टाची जोड या शिवाय पर्याय नाही. स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी योग्य मार्गदर्शन मिळणे खूप महत्त्वाचे आहे. अभ्यासक्रम, तयारीची योजना, योग्य मार्गदर्शन आणि संसाधने, तसेच यश मिळवण्यासाठी आवश्यक असलेले ध्येय आणि सकारात्मक दृष्टिकोन असणेही तितकेच महत्वाचे असल्याचे लक्ष्मीकांत कलमुर्गे यांनी म्हटले आहेत.
विविध अभ्यासक्रमांचे प्रवेश आणि वेगवेगळ्या शासकीय सेवांच्या निवडीसाठी चाळणी परीक्षा घेतली जाते. या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे या परीक्षांची काठिण्य पातळी अधिक वाढवण्यात आली आहे. या स्पर्धा परीक्षांची तयारी दहावी, बारावीपासून केली तर लवकर यश मिळवणे शक्य होते. कौशल्य विकसित करावे विविध अभ्यासक्रमांचे प्रवेश आणि वेगवेगळ्या शासकीय सेवांच्या निवडीसाठी चाळणी परीक्षा घेतली जाते. या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे या परीक्षांची काठिण्य पातळी अधिक वाढवण्यात आली आहे. या स्पर्धा परीक्षांची तयारी दहावी, बारावी पासून केली तर लवकर यश मिळवणे शक्य होते. स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यासाठी अनेकांना चार ते पाच वेळा प्रयत्न करावे लागतात. पहिल्या किंवा दुसऱ्या प्रयत्नात यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या नगण्य आहे. बरेच विद्यार्थी बारावीनंतर चार-पाच वर्षांचे अभ्यासक्रम पूर्ण करून स्पर्धा परीक्षांकडे वळतात. त्यामुळे त्यांची तयारी उशिरा सुरू होते व पुढे परत चार – पाच वर्ष अभ्यासात गेल्याने ते लवकर यश संपादन करू शकत नाहीत. बी.ए., बी.कॉम, बी.एस्सी. यासारख्या अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी समजा दहावी, बारावीपासून स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासक्रमास सुरुवात केली तर पदवी होईपर्यंत विद्यार्थ्यांचा जवळपास 50 टक्के स्पर्धा परीक्षेचा अभ्यास पूर्ण झालेला असेल व असे विद्यार्थी पहिल्या किंवा दुसऱ्या प्रयत्नात उत्तीर्ण होतात. जे विद्यार्थी कमी वयात अधिकारी होतील ते सहजपणे सर्वोच्च पदापर्यंत पोहोचू शकतात असे मत कलमूर्गे यांनी व्यक्त केले आहेत.
COMMENTS