Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये उद्यापासून मोफत तपासणी शिबीर

31 ऑगस्टपर्यंत सुरू राहणार शिबीर

अहमदनगर : राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी महाराज यांच्या 124 व्या जन्मजयंतीनिमित्त जैन सोशल फेडरेशन संचलित श्री आनंदऋषीजी हॉस्पिटल अ‍ॅण्ड हार्ट सर्जर

आजी-माजी आमदारांचा…संघर्ष शिगेला…; पारनेर, कर्जत व अकोल्यात आमदारकीनंतर पहिल्या थेट लढती
हळगाव येथील कृषी महाविद्यालयाला सोयी-सुविधा द्या
दुधाच्या 30 रूपये दरावर शिक्कामोर्तब

अहमदनगर : राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी महाराज यांच्या 124 व्या जन्मजयंतीनिमित्त जैन सोशल फेडरेशन संचलित श्री आनंदऋषीजी हॉस्पिटल अ‍ॅण्ड हार्ट सर्जरी सेंटर येथे उद्या शुक्रवार 2 ते 31 ऑगस्ट 2024 या कालावधीत विविध मोफत आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी महाराज यांची मानवसेवेची शिकवण व प्रबुध्द विचारक प.पू.आदर्शऋषीजी म.सा.यांच्या प्रेरणेतून हे शिबीर घेण्यात येत आहेत. दररोज सकाळी 10 ते दुपारी 2 या कालावधीत रूग्ण तपासणी करण्यात येणार आहे. दरवर्षी राबविण्यात येणार्‍या या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ असंख्य रूग्णांना झाला आहे.  आनंदऋषीजी हॉस्पिटलला एन.ए.बी.एच.मान्यता मिळालेली असून ही मान्यता असलेले नगर जिल्ह्यातील 260 बेडस्चे हे पहिलेच हॉस्पिटल आहे. हॉस्पिटलमधील उच्च दर्जाच्या आरोग्य सेवांचा लाभ या मोफत शिबिरांतून सर्वसामान्य रूग्णांना होणार आहे. हॉस्पिटलमध्ये एमआरआय तपासणी 2500 रुपये, सर्व प्रकारचे सिटी स्कॅन 1250 रुपये, सोनोग्राफी कलर प्रिंट व रिपोर्टसह 800 रुपये, डिजीटल एक्स रे तपासणी 250 रुपयात केली जाणार आहे. हॉस्पिटलमध्ये प्रशस्त व अतिप्रगत पॅथॉलॉजी विभाग, आंतरराष्ट्रीय दर्जाची ब्लड बँक, 35 अत्याधुनिक डायलेसिस मशिन विभाग, परिपूर्ण फिजिओथेरपी विभाग आहे.

या भव्य विविध मोफत आरोग्य तपासणी शिबिराला शुक्रवार 2 ऑगस्ट रोजी सुरूवात होणार आहे. पहिल्या दिवशी  कॅन्सर तपासणी, स्त्रियांचे कॅन्सर तपासणी शिबीर होणार आहे. यात घसा, फुफ्फुस, आतडे, तोंडाचा इत्यादी कॅन्सर तपासणी, स्त्रियांचे कॅन्सर तपासणी, स्त्रियांमधील स्तनाच्या कॅन्सरची तपासणी मॅमोग्राफी मशिनव्दारे करण्यात येईल. स्त्रियांच्या गर्भ पिशवीच्या कॅन्सरच्या तपासणीसाठी सवलतीच्या दरात पॅपस्मीयर तपासणी केली जाणार आहे. मॅमोग्राफी तपासणी फक्त 100 रुपयात करण्यात येणार आहे. ब्रेकिथेरपी, ब्लड कॅन्सर, पॅलीयेटिव्ह कॅन्सर उपचार, सिम्टोमॅटिक कॅन्सर उपचार, लहान मुलांचे कॅन्सर उपचार इत्यादी उपचार सुविधा अत्यल्प दरात उपलब्ध आहेत. या शिबिरात कॅन्सर सर्जन डॉ.अनिकेत शिंदे, डॉ.राहुल कांडेकर, डॉ.सतिष सोनवणे, कॅन्सर फिजिशियन डॉ.दत्तात्रय अंदुरे, कॅन्सर विकार तज्ज्ञ डॉ.डॉ.लिझा बलसरा, फिजिशियन डॉ.गिरी, डॉ.गवळी, डॉ.पारधे, सर्जन डॉ. विवेक भापकर, डॉ. प्रविण मुनोत, डॉ.भास्कर जाधव,  डॉ.आर.एन. पांडे, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ.रवींद्र मुथा, डॉ.सोनल बोरुडे, रेडिओलॉजीस्ट डॉ. मितेश कटारिया, डॉ. भक्ती फलके, डॉ.सोनाली सोलट, डॉ.निखिता जैन (कटारिया), पॅथॉलॉजी डॉ.मुकुंद उंडे, डॉ.सारिका झरेकर, मायक्रोबायोलॉजीस्ट डॉ.नरेंद्र पाटील रूग्ण तपासणी व मार्गदर्शन करणार आहेत. रविवार 4 ऑगस्ट रोजी पोटाचे आजार तपासणी शिबीर होईल. शुक्रवार 9 ऑगस्ट रोजी कान, नाक, घसा व स्पीच थेरपी तपासणी शिबीर होणार आहे. शनिवार 10 ऑगस्ट दंतरोग तपासणी व उपचार शिबीर होणार आहे. तसेच दर शनिवारी दंतरोग ओपीडी मोफत असते.रविवार 11 ऑगस्ट रोजी मोफत नेत्ररोग तपासणी शिबीर होणार आहे. महावीर भवन येथील आनंदऋषीजी नेत्रालय येथे होणार्‍या या शिबिरात अल्पदरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येतील. नेत्रतज्ज्ञ डॉ.प्रकाश कांकरिया, डॉ.अशोक महाडिक, डॉ.संदीप राणे, डॉ.प्रतिक कटारिया,डॉ.विशाल तांबे, डॉ.नेहा भराडिया, डॉ.किरण शिंदेे रूग्ण तपासणी व उपचार करतील. या शिबिरासाठी 8686401515 या मोबाईल क्रमांकावर नाव नोंदणी करता येणार आहे.  

सोमवार 12 ऑगस्ट रोजी बालरोग तपासणी शिबीर होणार आहे. बुधवार 14 ऑगस्ट रोजी किडनी आजार तपासणी शिबिर होणार आहे. शुक्रवार 16 ऑगस्ट रोजी एंडो युरोलॉजीकल (मूत्रपिंड, मूत्रमार्ग, मूत्राशय) यावर शिबीर होईल. शनिवार 17 ऑगस्ट रोजी अस्थिरोग तपासणी, मणके व सांधेबदली शस्त्रक्रिया शिबीर होणार आहे. सोमवार 19 ऑगस्ट रोजी मेंदूविकार व मेंदू शस्त्रक्रिया शिबीर होईल. बुधवार 21 ऑगस्ट रोजी जनरल शस्त्रक्रिया शिबीर होणार आहे. शुक्रवार 23 ऑगस्ट रोजी प्लॅस्टिक सर्जरी शिबीर होणार आहे. रविवार 25 ऑगस्ट रोजी हृदयरोग तपासणी शिबीर होणार आहे. मंगळवार दि.27 ऑगस्ट रोजी स्त्रीरोग, गर्भवती महिला आरोग्य तपासणी शिबीर होणार आहे. गुरुवार 29 ऑगस्ट रोजी मधुमेह, उच्च रक्तदाब, थायरॉईड, ग्रंथीविकार संबंधित आजार तपासणी शिबीर होईल. शिबिराची सांगते वेळी शनिवार 31 ऑगस्ट रोजी  दुर्बिणीव्दारे शस्त्रक्रिया (बिनटाका) शिबीर होणार आहे. या शिबिराची नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी 0241-2320473/74/75 या दूरध्वनी क्रमांकावर अथवा 9404399911 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन जैन सोशल फेडरेशनतर्फे करण्यात आले आहे.  हॉस्पिटल शेजारील महावीर भवन येथे फक्त 35 रुपयांत भोजनाची व्यवस्था कार्यरत आहे. तसेच 24 तास आनंदऋषीजी ब्लड बँक कार्यरत आहे. 

COMMENTS