मुंबई :‘ एकही मतदार मागे राहू नये या संकल्पानुसार मुंबई जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांसाठी 20 मे 2024 रोजी मतदानासाठी विशेष विनामूल्य बस सेवा उपलब्
मुंबई :‘ एकही मतदार मागे राहू नये या संकल्पानुसार मुंबई जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांसाठी 20 मे 2024 रोजी मतदानासाठी विशेष विनामूल्य बस सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने आज जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून या बस सेवेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रत्यक्ष दिव्यांग बांधवांशी जिल्हाधिकारी क्षीरसागर यांनी संवाद साधला.
वांद्रे पूर्व येथील मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात दिव्यांग मतदारांसाठी विनामूल्य बस सेवेच्या उद्घाटन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी मनोज गोहाड, उपजिल्हा निवडणूक अधिकारी तेजस समेळ, जिल्हा दिव्यांग समन्वय अधिकारी प्रसाद खैरनार उपस्थित होते. मुंबई उपनगर जिल्ह्यात 4 लोकसभा मतदारसंघात 20 मे 2024 रोजी लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. त्यादृष्टीने विधानसभा मतदारसंघानिहाय ठरविलेल्या एका निश्चित मार्गावर 613 ठिकाणी बेस्ट मार्फत व्हिलचेअर प्रवेश योग्य मोफत बस सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रावर जाऊन मतदान करता यावे यासाठी 1106 व्हिलचेअर देखील मतदान केंद्रांवर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. इझी टु मुव्ह या संकल्पने अंतर्गत ज्या विधानसभा मतदारसंघात लोकोमोटर म्हणजेच अस्थिव्यंग मतदारांची संख्या तुलनेने अधिक आहे. अशा 9 विधानसभा मतदारसंघात व्हिलचेअर क्सेसीबल टॅक्सींची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच प्रत्येक विधानसभा मतदारसंघानिहाय 25 लोफ्लोअर ईलेक्ट्रीक व्हिलचेअर क्सेसीबल बस उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
COMMENTS