Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोपरगावमध्ये मोफत सर्व रोग निदान शिबीर उत्साहात

कोपरगाव शहर ः कोपरगाव जेष्ठ नागरिक सेवा मंच, जेष्ठ महिला समिती, कोपरगाव शहर डॉक्टर्स, ग्रामीण रुग्णालय व साई सेवा भक्त मंडळ यांच्या संयुक्त विद्य

बसच्या सीटखाली ठेवलेला दागिन्यांचा डबा लांबवला
आमदार मोनिका राजळे यांचे सहकार क्षेत्रातील वर्चस्व कायम
लोणी-नांदूर शिंगोटे हायवेवर मालवाहतूक पिकअपचा भीषण अपघात.

कोपरगाव शहर ः कोपरगाव जेष्ठ नागरिक सेवा मंच, जेष्ठ महिला समिती, कोपरगाव शहर डॉक्टर्स, ग्रामीण रुग्णालय व साई सेवा भक्त मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत सर्वरोग निदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.
यावेळभ हृदयरोगतज्ज्ञ डॉ.डि.एस मुळे, डॉ.महेंद्र गोंधळी, डॉ.रविंद्र कुलकर्णी, कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी, जेष्ठ नागरिक सेवा मंचच्या अध्यक्षा सुधाभाभी ठोळे, महिला समितीच्या अध्यक्षा रजनीताई गुजराथी, कार्याध्यक्ष विजय बंब, जेष्ठ नागरिक सेवा मंचचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी ब्लड प्रेशर, ब्लड शुगर, नाक कान घसा, डोळे आदि तपासणी करण्यात आली.उपस्थित मान्यवरांचे मंचच्या वतीने सत्कार करण्यात आले. शिबिरासाठी रुग्ण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS