Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पेटीएमचे कर्मचारी सांगून दोन व्यावसायिकांची फसवणूक

खात्यातून परस्पर पैसे काढले; ब्राम्हणी येथील घटना

देवळाली प्रवरा/प्रतिनिधी ः राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी येथील एका व्यापार्‍याच्या दुकानात दोन अनोळखी तरूण गेले. आम्ही पेटीएमचे कर्मचारी आहे. असे

नाटेगावच्या सरपंचपदी जयवंत मोरे
मराठी लेखक,भाषांतरकार,पत्रकार,संपादक वासुदेव गोविंद आपटे यांची जयंती | Lok News24
विद्यार्थ्यांचे यश हेच गावाचे यश – शिवाजी कराड

देवळाली प्रवरा/प्रतिनिधी ः राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी येथील एका व्यापार्‍याच्या दुकानात दोन अनोळखी तरूण गेले. आम्ही पेटीएमचे कर्मचारी आहे. असे सांगून व्यापार्‍याचा विश्‍वास संपादन केला. त्यानंतर व्यापार्‍याच्या खात्यावरून ऑनलाईन 29 हजार रुपये काढून घेतले. अशाच प्रकारे दुसर्‍या एका व्यापार्‍याच्या खात्यामधून 10 हजार रुपये काढून घेतल्याच्या घटना घडल्या आहे.
राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी येथिल प्रकाश शिवाजी नगरे (वय 35) हे  त्यांचे ऑटोमोबाईल चे दुकान आहे. प्रकाश नगरे हे त्यांच्या दुकानात पेटीएम स्कॅनर मार्फत पैसे घेतात. दोन महिन्यापूर्वी त्यांनी पेटीएम   साउंड बॉक्स वापरण्यास सुरवात केली होती. 26 फेब्रुवारी रोजी दुपारी साडेचार वाजे दरम्यान दोन अनोळखी इसम प्रकाश नगरे यांच्या दुकानावर गेले. आम्ही पेटीएमला कामाला आहे. असे त्यांनी सांगीतले. तेव्हा नगरे यांनी त्यांना सांगितले की, मला पेटीएम बंद करावयाचे आहे. तेव्हा त्यांनी सांगितले की, तुमचा मोबाईल माझ्याकडे द्या व तुमचे आधारकार्ड आणि पॅनकार्ड द्या, तुमचे पेटीएम बंद करतो. त्याप्रमाणे नगरे यांनी त्यांना मोबाइल दिला व आधारकार्ड, पॅनकार्ड त्यांना दाखवले. त्यांनी मला सांगितले की, आज नेटवर्क प्रोब्लेम आहे. तुमचे पेटीएम आज बंद होणार नाही. आम्ही उद्या येऊ, असे बोलुन ते दोघे तेथुन निघुन गेले. त्यानंतर दुसर्‍या दिवशी दि. 27 फेब्रुवारी रोजी सायंकाळी तेच पेटीएम चे दोन अनोळखी इसम दुकानावर आले. त्यांनी पुन्हा प्रकाश नगरे यांचा मोबाइल, आधारकार्ड, पॅनकार्ड घेतले. त्यानंतर त्यांनी सांगितले की, आता तुमचे पेटीएम बंद झाले आहे. दोन दिवसांनी कंपनीचे लोक येतील त्यांना तुम्ही पेटीएम साउंड बॉक्स, चार्जर देवुन टाका, असे सांगुन तेथून निघून गेले. दि. 13 मार्च रोजी प्रकाश नगरे यांना पेटीएम कंपनीचा फोन आला व त्यांनी मला विचारणा केली की, तुम्ही पेटीएमचे क्रेडीट प्रोस्पेड पेमेंट घेतलेले आहे. ते पैसे भरले का नाही. त्यावेळी आपली फसवणूक करून खात्यामधून एकूण 29 हजार रुपये काढून घेतल्याचे नगरे यांच्या लक्षात आले. दुसर्‍या घटनेत गणेश बन्सी रहाणे, राहणार गोटुंबे आखाडा, ता. राहुरी. यांच्या सप्तश्रुंगी जनरल स्टोअर्स या दुकानातही त्याच दोन अनोळखी भामट्यांनी रहाणे यांच्या खात्यामधून  10 हजार रुपये या काढून घेतले. या घटनेत दोन्ही खात्यामधून काढलेली रक्कम ही विनोदकुमार बब्रुवान बनसोडे यांच्या पेटीएमचे प्रोस्पेड खातेवर गेली गेली आहे.फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर प्रकाश शिवाजी नगरे यांनी राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून दोन अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा रजि. नं. 321/ 2023 भादंवि कलम 420, 419, 34, 66 (सी) प्रमाणे फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास राहुरी पोलिस निरीक्षक मेघःशाम डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

COMMENTS