Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

खोट्या पार्किंगच्या नावाखाली लाखोची फसवणूक

देवळाली प्रवरा, राहुरी फॅक्टरीच्या तिघांसह नगर व मुंबईच्या दोन महिलांवर गुन्हा

देवळाली प्रवरा ः खोट्या पार्किग दाखवून कोट्यावधी रुपयांची गुंतवणूक गोळा करून राहरी, देवळाली प्रवरा व नगर जिल्हातील अनेकांची आर्थिक फसवणुक केल्याचा धक

मयताच्या वारसाला न विचारता जमिनीची बेकायदा विक्री
पेट्रोल, सीएनजी पंपाची डीलरशीप देतो म्हणून 61 लाखांची फसवणूक
दहा द्राक्ष बागायतदारांना जयपूरच्या व्यापाऱ्याकडून गंडा 

देवळाली प्रवरा ः खोट्या पार्किग दाखवून कोट्यावधी रुपयांची गुंतवणूक गोळा करून राहरी, देवळाली प्रवरा व नगर जिल्हातील अनेकांची आर्थिक फसवणुक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याच प्रकरणात पुण्यातील एका महिलेची 3 लाख 50 हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सदर महिलेने विमानवणर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असता देवळाली प्रवरा येथील तिघांसह अहमदनगर व मुंबई येथील दोन महिलांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करणयात आला आहें. याप्रकरणी नगर जिल्हयात एकच खळबळ उड़ाली आहे.
              याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, देवळाली प्रवरा येधील तीन तरुण नगर, पूणे येधील दोन महिलांनी एकञित येऊन खोट्या पार्किंग दाखवून देवळाली प्रवरा, राहुरी फँक्टरी, पुणे जिल्ह्यातून पार्किंग टेक्नोलाँजी कंपनीमध्ये कोट्यावधी रुपयांची गुंतवणूक घेऊन ती रक्कम कार्किंग मोब्यालिटी प्रायव्हेट कंपनीत फिरवले गेले. पुण्यातील धानोरी येथील निशा प्रदीप गुप्ता या महिलेने विमानगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. निशा गुप्ता याना कंपनीचे संचालक महेश सत्तुजी टिकल ( ह.रा. विमाननगर,पुणे मु.पो.देवळाली प्रवरा), प्रशांत खाबुराव कोठुळे (रा.वृदांवन कॉलनी,राहुरी फँक्टरी), अक्षय भीमराज दळवी (रा.देवळाली प्रवरा) रेवती अभिजित धापाडे ( रा. सावेडी, अहमदनगर ) व तेजश्री विष्ण जिंमाल (कर्ला,मुंबई) यांनी विमाननगर येथील पार्किंग दाखवून 3 लाख 50 हजार रूपयांची गुंतवणूक घेतली, मात्र गुप्ता यांना सदर कंपनीकडे पार्किग नसल्याचे समजताच त्यानी 3 लाख 50 हजार रुपयांची मागणी केली.परंतू रक्कम परत न दिल्याने निशा गुप्ता यांनी विमाननगर पोलीस ठाणे गाठून फिर्याद दाखल केली आहे.या फिर्यादी वरून महेश सत्तुजी टिक्कल (रा.विमाननगर, पुणे ह.रा.देवळाली प्रवरा), प्रशांत बाबुराव काठुळे (रा.वृदांवन कॉलनी, राहुरी फँक्टरी), अक्षय भीमराज दळवी (रा.देवळाली प्रवरा) रेवती अभिजित धापाडे  (रा.सावेडी,अहमदनगर) व तेजश्री विष्णू जिंमाल(रा.कुर्ला मुंबई) यांच्याविरूद्ध भादंवी कलम 406,420,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रविंद्र ढावरे हे करीत आहे. पार्किंग मोब्यालिटी प्राव्हेट लिमिटेड कंपनीने अहमदनगर महानगरपालिकेचे खोटे लेटरहेड बनवून अनेकांना आकर्षित करत मोठया प्रमाणात आर्थिक गुंतवणूक जमा केल्याचे समोर आले आहे. याबाबत अहमदनगर महानगरपालिकेत लेखी तक्रार दाखल असून महानगरपालिका आयुक्त यांनी कंपनी संचालकावर सरकारी खोटे कागदपत्रे बनवले म्हणून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. मनपा आयुक्त याप्रकरणी काय कारवाई करणार याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे.

COMMENTS