Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

घराच्या शोधातील व्यक्तीची साडेचार लाखाची फसवणूक

अहमदनगर/प्रतिनिधी ः नवीन घर खरेदीच्या शोधात असलेल्या येथील महापालिकेच्या सफाई कामगाराची 4 लाख 71 हजाराची फसवणूक झाली आहे. राजू सदाशिव अवघडे (वय 5

शिक्रापूरच्या युवकांची उत्तराखंड मध्ये फसवणूक
कर्मचार्‍यानेच केली एल अँड टी कंपनीची फसवणूक
संगणक अभियंत्याची एक कोटींची फसवणूक

अहमदनगर/प्रतिनिधी ः नवीन घर खरेदीच्या शोधात असलेल्या येथील महापालिकेच्या सफाई कामगाराची 4 लाख 71 हजाराची फसवणूक झाली आहे. राजू सदाशिव अवघडे (वय 53, रा. सिध्दार्थनगर, नगर) असे फसवणूक झालेल्या कामगाराचे नाव आहे. त्यांनी सोमवारी, 3 एप्रिलला तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून भीमराज रामभाऊ सरोदे (रा. बोल्हेगाव, मूळ रा. देवळाली) याच्याविरुध्द भादंवि कलम 406, 420 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजू अवघडे यांना नवीन घर खरेदी करायचे असल्याने ते घर शोधत असताना त्यांची भेट भीमराज सरोदे याच्यासोबत झाली. त्याने अवघडे यांचा विश्‍वास संपादन केला. तुम्हाला नवीन घर देतो असे म्हणून त्यांच्याकडून चेकव्दारे 27 जानेवारी 2020, 18 फेब्रुवारी 2020, 25 नोव्हेंबर 2020, 2 फेब्रुवारी 2021 व 15 सप्टेंबर 2021 अशा तारखेनुसार एकुण चार लाख 71 हजार रुपये घेतले. पण, अवघडे यांना अद्यापपर्यंत नवीन घर दिले नाही व घेतलेले पैसेही परत दिले नाही. सरोदे याने ते घर दुसर्‍या व्यक्तीला विक्री करून अवघडे यांची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर अवघडे यांनी पोलिस अधीक्षक यांच्या नावाने तक्रार अर्ज दाखल केला होता. त्या अर्जाची चौकशी होवून सोमवार 3 एप्रिल 2023 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस अंमलदार एस. पी. गर्जे तपास करीत आहेत.

COMMENTS