पिकअप दिंडीत घुसल्याने अपघात, चार महिलांचा मृत्यू

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पिकअप दिंडीत घुसल्याने अपघात, चार महिलांचा मृत्यू

पुणे : आळंदी येथे संत ज्ञानेश्वर महाराज समाधी सोहळ्यानिमित्त माऊली कृपा चॅरिटेबल ट्रस्ट पायी दिंडी जात असताना शनिवारी (दि.२७) सकाळी ७ वा.साते फाटा मु

महाविकास आघाडीतच रस्सीखेच सुरू
महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने पुरोगामी बनवण्यासाठी ‘बसपा’च पर्याय
लोकसभेसाठी 65 कोटी मतदारांनी केले मतदान

पुणे : आळंदी येथे संत ज्ञानेश्वर महाराज समाधी सोहळ्यानिमित्त माऊली कृपा चॅरिटेबल ट्रस्ट पायी दिंडी जात असताना शनिवारी (दि.२७) सकाळी ७ वा.साते फाटा मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात झाला.
या अपघातात मालवाहतूक पिकअप जोरात दिंडीत घुसल्याने २४ जण जखमी तर चार महिलांचा मृत्यू झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस, रुग्णवाहिका व स्थानिक नागरिकांनी जखमींना औषधोपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. अपघाताची माहिती मिळताच मावळचे आमदार सुनील शेळके यांनीही दिंडीतील भाविक व जखमींना मदत पाठविली आहे.
पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या आदेशानुसार अप्पर पोलीस अधीक्षक मित्तेश घट्टे, उप विभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र पाटील व पोलीस निरीक्षक विलास भोसले आदींनी घटनास्थळी व जखमींची विचारपूस केली. जयश्री आत्माराम पवार (वय ५४रा. कर्जत, भूतीवली) सविता वाळकू यरम (वय ५८रा. खालापूर, उंबरे ) आणि विमल चोरगे ( वय ५० रा. खालापूर), संगीता वसंत शिंदे (वय ५६ रा. कर्जत ता. खालापूर) या चार महिलांचा अपघातात मृत्यू झाला आहे.

COMMENTS