Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

खुनाच्या गुन्हात जन्मठेप झालेले चौघे निर्दोष

अ‍ॅड. सुनील मगरे यांची माहिती

अहमदनगर ः अहमदनगर जिल्हातील पाथर्डी तालुक्यातील आडगाव येथील 2018 च्या घटनेत चार आरोपींना जिल्हा व सत्र न्यायालय अहमदनगर यांनी जन्मठेपेची शिक्षा स

पिंपरी निर्मळ येथील गुन्ह्यातील 57 आरोपींना अटकपूर्व जामीन
कोपरगाव मतदारसंघासाठी साडेपाचशे कोटीहून अधिक निधीची तरतूद – कोल्हे
घोडेगावच्या पाणी टाकीच्या जागेचा निर्णय ग्रामसभेतच होणार

अहमदनगर ः अहमदनगर जिल्हातील पाथर्डी तालुक्यातील आडगाव येथील 2018 च्या घटनेत चार आरोपींना जिल्हा व सत्र न्यायालय अहमदनगर यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. मात्र याविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अपील दाखल केले होते. याप्रकरणी न्यायालयाने नुकताच निर्णय दिला असून चारही जणांना निर्दोष सोडले असल्याची माहिती अ‍ॅड. सुनील मगरे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
याविषयी सविस्तर माहिती अशी की, 11 ऑक्टोबर 2018 रोजी फिर्यादी राजू रभाजी शिंदे यांनी पाथर्डी पोलिस स्टेशन येथे तक्रार दिली की त्याचा भाऊ अशोक रभाजी शेंडे ह्याला आरोपी चंद्रकांत बर्फे, अमोल बर्फे, सुरेश बर्फे, शिवाजी बर्फे यांनी शेतामध्ये मारहाण करुन अपहरण केलेले आहे व सदरिल घटनेस माणिक लोंढे हा प्रत्यक्ष साक्षीदार आहे अशा स्वरुपाची तक्रार दाखल केली होती. सदरिल तक्रारीवरुन कलम 364 व 34 भा. द. वि. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात होता. सदरिल तक्रार दाखल करतांना अपिलार्थी (आरोपी) व फिर्यादी यांचे शेतीच्या कारणावरुन वाद होते. तसेच फिर्यादी हा भारतीय सैन्यामध्ये कार्यरत आहे व त्याचा भाऊ हा गावामध्ये त्यांची शेतीचे कामकाज बघतो.  त्यानंतर 12 ऑक्टोबर 2018 रोजी मयत अशोक रभाजी शेंडे याचे धारवाडी शिवार येथे रस्त्याच्या कडेला प्रेत मिळून आले. त्यामुळे सदरील प्रकारणामध्ये 302, 201 ह्या प्रमाणे वाढीव कलम लावण्यात आले. सदर प्रेताच्या अंगावर मारहाणीच्या व तसेच  जळालेच्या जखमा आढळून आल्या. सदर प्रकरणामध्ये फिर्यादीच्या पुरविणी जबाबावरुन राजू बर्फे व सुनिल बर्फे यांचे आरोपी म्हणून नाव घेण्यात आले होते. त्यावरुन यांचे सुध्दा आरोपी म्हणून सदरील गुन्हामध्ये नाव समाविष्ट करण्यात आले. या प्रकारणात एकूण 6 आरोपी विरुद्ध कलम 302, 363, 201, 143, 147, 148, 149 प्रमाणे दोषारोप पत्र न्यायालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणामध्ये सरकार पक्षातर्फे एकूण 12 साक्षीदार तपासण्यात आले. या प्रकरणामध्ये आरोपी राजू बर्फे व सुनिल बर्फे यांची माननीय जिल्हा व सत्र न्यायालय अहमदनगर यांनी र्निदाष मुक्तता केली व आरोपी चंद्रकांत बर्फे, अमोल बर्फे, सुरेश बर्फे आणि शिवाजी बर्फे यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली तसेच कलम 302 साठी रु 5,000/- कलम 325 साठी रु. 1000/- कलम 364 प्रमाणे रु 1000/- कलम 201 प्रमाणे प्रत्येकी दंड ठोठविण्यात आला. या निर्णयाविरोधात चारही आरोपींनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अपील करून आव्हान दिले होते. याप्रकरणी द्विसदस्यी पीठाचे न्यायमूर्ती आ.जी.अवचड व एन.पी. धोटे यांच्यासमोर झाली. अंतीम युक्तीवादाच्या वेळेस साक्षीदार क्र 5 माणिक लोंढे ह्याच्या साक्ष ग्राह्य धरुन जिल्हा व सत्र न्यायालय यांनी शिक्षा सुनावण्यात आली होती. सदर साक्षीदार हा पेरलेला साक्षीदार असून तो मयताचा व फिर्यादीचा जवळचा नातेवाईक आहे व हा साक्षीदार हा विश्‍वसनिय नसून सदर साक्षीदारावर अनेक गुन्हे प्रलंबित आहे तसेच सदरिल साक्षीदार हा नैसर्गिक नसून हा खोटा साक्षीदार आहे हि बाब माननीय न्यायलयाच्या निदर्शनास आणून दिली तसेच युक्तीवादाच्या पुष्ठेयार्थ माननीय सर्वोच्य न्यायालयाचे व उच्च न्यायालयाचे न्यायनिवाडे हे विचारत घेऊन चारही आरोपींची जिल्हा न्यायलयात झालेली शिक्षा रद्द केली. या प्रकरणामध्ये अ‍ॅड. सुनिल मगरे यांनी अपीलार्थ चंद्रकांत बर्फे व अमोल बर्फे त्यांच्यातर्फे कामकाज पाहिले. त्यांना अ‍ॅड. सी. एस. गवई, अ‍ॅड. हेमंत मोरे, अ‍ॅड. सुजाता मोरे, अ‍ॅड. प्रतिक्षा मगरे यांनी सहकार्य केले.

COMMENTS