Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चार खेळाडूंचा अपघातात मृत्यू

अमरावतीतील जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्‍वरजवळील घटना

अमरावती : अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्‍वर यवतमाळ मार्गावर आज सकाळी खाजगी बस आणि काँक्रिट मिक्सर यांच्यात भीषण धडक झाली. या अपघातात जणांचा म

यवतमाळमध्ये अपघातात 4 जणांचा मृत्यू
बीडमध्ये अपघातात चौघांचा जागीच मृत्यू
तळेगाव ढमढेरेजवळील अपघातात तिघांचा मृत्यू

अमरावती : अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्‍वर यवतमाळ मार्गावर आज सकाळी खाजगी बस आणि काँक्रिट मिक्सर यांच्यात भीषण धडक झाली. या अपघातात जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 10 जण जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
आजच्या दिवसाची सुरुवात भीषण अपघाताने झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमरावती येथील कबड्डीपटू हे यवतमाळ येथील सुरू असलेल्या एका स्पर्धेसाठी ट्रॅव्हल्सने जात होते. मात्र, अमरावती नांदगाव खंडेश्‍वर यवतमाळ मार्गावर समोरुन येणार्‍या काँक्रिकट मिक्सने त्यांच्या बसला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, बसचा समोरील भागचा अक्षरक्ष:चक्काचूर झाला. या अपघातात चार खेळाडूंचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, 10 जणांना गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर परिसरातील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातातील मृतांच्या नावांची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

COMMENTS