Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुण्यातून बांगलादेशी तरुणीसह चौघींची सुटका

पुणे ः पुणे-अहमदनगर रस्त्यावरील वाघोली परिसरात एका लॉजमध्ये सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकला. य

देह व्यापारातील महिलांनी केला वाईन विक्रीला विरोध | DAINIK LOKMNTHAN
वरवंडीत सर्वधर्म गुरूपौर्णिमा उत्साता
त्रंबकेश्वरला दररोज पाऊसाची हजेरी रोज तीन ऋतूंचा अनुभव

पुणे ः पुणे-अहमदनगर रस्त्यावरील वाघोली परिसरात एका लॉजमध्ये सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी बांगलादेशी तरुणीसह चौघींना ताब्यात घेतले. याप्रकरणी लॉज व्यवस्थापकासह दलालांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी लिंबाजी सखाराम वाघमारे (29, रा. आळंदी फाटा, लोणीकंद, पुणे), प्रवीण शेखर पुजारी अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. वाघमारेला अटक केली आहे. पोलिस हवालदार मनीषा पुकाळे यांनी याबाबत लोणीकंद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. नगर रस्त्यावरील वाघोली परिसरात जय भवानी लॉज येथे वेश्याव्यवसाय करण्यात येत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने सदर ठिकाणी कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी एका बांगलादेशी तरुणीसह चौघींना ताब्यात घेतले. याप्रकरणी चौकशी सुरू आहे.

COMMENTS