Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

एकाच कुटुंबातील चौघांचा अपघातात मृत्यू

सांगली-विटाजवळ ट्रॅव्हल्स आणि कारची धडक

सांगली : सांगलीच्या विटाजवळ गुरूवारी सकाळी 7 च्या समरस खाजगी ट्रॅव्हल्स आणि कारची समोरासमोर भीषण धडक झाली. या अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा जाग

दोन डबल डेकर बसमध्ये भीषण अपघात.
छत्तीसगडमध्ये ट्रक आणि बोलोरा गाडीच्या भीषण अपघातात १० जणांचा जागीच मृत्यू
बारामतीत बस अपघातात 27 विद्यार्थिनी जखमी

सांगली : सांगलीच्या विटाजवळ गुरूवारी सकाळी 7 च्या समरस खाजगी ट्रॅव्हल्स आणि कारची समोरासमोर भीषण धडक झाली. या अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात कारचा चक्काचूर झाला. सुदैवाने गाडीत असणारी एअर बॅग वेळीच उघडल्याने गाडीतील एक व्यक्ती बचावला. अपघातानंतर या मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
विटा येथील सातारा मार्गावर शिवाजीनगर परिसरात हा अपघात घडला. मृतांमध्ये एक महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे. हे सर्व तासगाव तालुक्यातल्या गव्हाण येथील असल्याची माहिती आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गव्हाण येथील काशीद कुटुंब हे साताराहून विटाकडे येत होते. काल सकाळी विट्याहून महाबळेश्‍वर राज्य मार्गावरून सातार्‍याकडे खाजगी ट्रॅव्हल्सने एक बस निघाली असता शिवाजीनगर या ठिकाणी असलेल्या तीव्र उतारावर दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली. या अपघातात कार मधील चौघांचा मृत्यू झाला. सुदैवाने गाडीत असणारी एअर बॅग वेळीच उघडल्याने गाडीतील एक व्यक्ती बचावला. या अपघातानंतर विटा-सातारा मार्गावरील वाहतूककोंडी झाली. या घटनेची माहिती मिळताच विटा पोलिस घातस्थळी आले. त्यांनी तातडीने मृतदेह कार कडून काढून विटा येथील एका रुग्णालयात पाठवले. दरम्यान, अपघातग्रस्त वाहन कार बाजूला घेऊन या मार्गावरील वाहतूक कोंडी दूर करण्यात आली.

COMMENTS