पंढरपुरात एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या

Homeताज्या बातम्या

पंढरपुरात एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या

सोलापूर : राज्यात एकीकडे आषाढी एकादशीचा उत्साह असतांना दुसरीकडे कौटुंबिक वादातून पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथे आषाढी एकादशी दिवशी 25 वर्षाची प

चंद्रग्रहणानिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन बंद
पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे लाईव्ह दर्शन घरबसल्या घेता येणार
तीर्थक्षेत्र पंढरपूर येथे सात दिवस भव्य दिव्य तुळशी पूजा व श्रीमद्भागवत सप्ताह भक्तिभावात संपन्न


सोलापूर :

राज्यात एकीकडे आषाढी एकादशीचा उत्साह असतांना दुसरीकडे कौटुंबिक वादातून पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथे आषाढी एकादशी दिवशी 25 वर्षाची पत्नी मोनाली, सहा वर्षाचा मुलगा कार्तिक आणि चार वर्षाची मुलगी प्रगती यांनी आपल्याच शेतातील विहिरीत आत्महत्या केली. मोनाली हिने आपल्या दोन मुलांना घेऊन विहिरीत उडी टाकल्याचे समजतात पती म्हमाजी याने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याने पंढरपूरसह सोलापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.


घटनेची माहिती मिळताच पंढरपूर तालुका पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. कासेगावातील शेतात जाऊन या विहिरीतून मोनाली आणि तिच्या दोन चिमूरड्यांचे मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू केले आहे. घटना घडल्यापासून सातत्याने विहिरीतले पाणी उपसणे सुरू असून आत्तापर्यंत फक्त 4 वर्षांचा मुलगा कार्तिक याचा मृतदेह सापडला आहे. बाकीचे मृतदेह शोधण्यासाठी पंढरपूरची आपत्कालीन यंत्रणा विहिरीत उतरून शोध घेत आहे.

पंढरपूर तालुका पोलिसात याची नोंद झाली असून पुढील अधिक तपास पोलीस यंत्रणांकडून सुरू करण्यात आला आहे. दरम्यान, या कुटुंबाचा प्रमुख असलेला आणि गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या म्हमाजी आसबे याचा मृतदेह पोलिसांनी खाली काढला. पती-पत्नीच्या कौटुंबिक वादातून ही धक्कादायक घटना झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे.

COMMENTS