Homeताज्या बातम्यादेश

फटाक्यांच्या कारखान्याच्या आगीत चौघांचा मृत्यू

उत्तरप्रदेशातील कौशांबी येथील घटना

लखनौ ः देशामध्ये गेल्या काही महिन्यांपासून फटाक्यांच्या कारखान्याला आगी लागण्याच्या घटना घडत असून, रविवारी उत्तरप्रदेशातील कौशांबी येथील फटाक्यां

राज्यात लम्पीने 32 जनावरांचा मृत्यू : मंत्री विखे
LokNews24 LIVE l आमदार गोपीचंद पडळकर यांची पत्रकार परिषद
नाशिक पुणे महामार्गावर गॅस वाहून नेणारा टेम्पो पलटी

लखनौ ः देशामध्ये गेल्या काही महिन्यांपासून फटाक्यांच्या कारखान्याला आगी लागण्याच्या घटना घडत असून, रविवारी उत्तरप्रदेशातील कौशांबी येथील फटाक्यांच्या कारखान्यात रविवारी भीषण आग लागली. यानंतर मोठा स्फोट होऊन यात चौघांचा मृत्यू झाला. 2 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. 10 जण गंभीर जखमी आहेत. त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
सध्या कारखान्यात आणखी अनेक जण अडकल्याची शक्यता आहे. कारखान्यात 24 जण काम करत होते. या अपघातात कारखाना मालकाचाही मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. कारखान्याला लागलेल्या आगीमुळे संपूर्ण परिसरात धुराचे लोट पसरले आहेत. या आगीने आजूबाजूच्या घरांनाही आपल्या कवेत घेतले आहे. सध्या अनेक पोलिस ठाण्यांचे पोलिस दल आणि अग्निशमन दल बचाव कार्यात गुंतले आहेत. आजूबाजूचे लोक सांगतात की आम्ही घरात होतो. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, अचानक आम्हाला खूप मोठा आवाज ऐकू आला. सुरुवातीला आम्हाला वाटले की हवामान खराब आहे आणि ढगांचा गडगडाट आहे, पण आम्ही बाहेर आलो तेव्हा आकाशात धुराचा एक मोठा फुगा दिसला. कारखान्यात जोरदार स्फोट झाले, कामगारांनी उडी मारली आणि आमच्या समोर सुमारे 15 फूट पडले होते.

COMMENTS