गुहा येथे कार व बसची समोरासमोर धडक ; चार ठार

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गुहा येथे कार व बसची समोरासमोर धडक ; चार ठार

  देवळाली प्रवरा /प्रतिनिधी : नगर-मनमाड राज्य महामार्गावर गुहा पाट नजीक अलिशान कारचा आणि एस टी बसची समोरासमोर धडक होवून  भीषण अपघात झाला. या अपघातात

बाल संस्कार शिबिरे आयुष्याची शिदोरी ः भगवान महाराज मोरे
धर्मकार्य आणि साहित्यसेवा माणुसकीला बळ देईल ः प्रा. आदिनाथ जोशी
कोपरगावमध्ये शहरात फटाके वाजविण्यावरून मारहाण

 
देवळाली प्रवरा /प्रतिनिधी : नगर-मनमाड राज्य महामार्गावर गुहा पाट नजीक अलिशान कारचा आणि एस टी बसची समोरासमोर धडक होवून  भीषण अपघात झाला. या अपघातात चार जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.मृतांमध्ये दोन महिला, चालक व सात महिण्याचा लहान मुलाचा समावेश आहे.नगर मनमाड महामार्गाचे काम चालू असताना ठेकेदाराने दिशादर्शक फलक लावले नसल्याने ना.प्राजक्त तनपुरे यांनी ठेकेदारास कानपिचक्या दिल्या होत्या.परंतू  या कानपिचक्यातून ठेकेदाराची कान उघडणी न झाल्यामुळे अपघाताची मालिका सुरुच असुन मध्येप्रदेश येथिल कुटुंब या अपघाताचा बळी ठरला आहे. 

रविवारी  दुपारच्या दरम्यान साडेतीन वाजता नगर कडुन शिर्डिकडे चाललेली बस तर मध्य प्रदेश येथील अलिशान चार चाकी गाडी क्र.एम पी 10 सी बी 1236 हि मध्यप्रदेश येथुन पुण्याकडे चालली असताना  नगर-मनमाड राज्य महामार्गावर गुहा पाठ नजिक समोरासमोर हा भीषण अपघात घडला. अपघात इतका भीषण होता की चार चाकी गाडीचा चक्काचूर होऊन यामध्ये चार जण ठार तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.या अपघातात सात महिण्याचा मुलगासह दोन महिला,चालक जागिच ठार झाले.मृतांची मध्ये  रंजना दीपक तारे (वय 55 ),प्रतीक्षा विपुल तारे  (31),लुनय विपुल तारे (वय 7 महीने),चालक जगदीश राठोड (वय 35)सर्व रा. खरगोन मध्यप्रदेश येथिल आहे. तर जखमी मध्ये विपुल दीपक तारे (वय 33 हल्ली रा.पुणे) याचा समावेश आहे.विपुल हा पुणे येथे नोकरीस असल्याने पुणे येथे बंगला भाड्याने घेतला होता.आई रंजना, पत्नी प्रतीक्षा,मुलगा लुनय यांच्या समवेत पुणे येथे चालला होता.परंतू  काळाने घाला घातल्याने कुटुंबच या अपघात ठार झाले. विपुल हा एकमेव या कुटुंबातील सदस्य बचावला आहे.  घटना घडताच येथील  स्थानिक..दिलीप बोरुडे , शशि वाबळे,राजेंद्र बोरुडे,विवेक लांबे,ओहोळ सर,अमर वाबळे,वैभव लांबे,सागर लांबे,सूरज ओहोळ ,शशी कोळसे आदिंसह स्थानिक नागरिकांनी मदतकार्य केले.      अपघातस्थळी पोलिस उपनिरीक्षक मधुकर शिंदे, सज्जन नाहेडा, पो.हे.काँ.दिनकर गर्जे, लक्ष्मण बोडखे, रोहित पालवे, सोमनाथ जायभाये, गणेश लिपणे, रवींद्र कांबळे आदी पोलीसांनी मदत कार्य करून उशिरापर्यंत वाहतूक सुरळीत केली.अपघातासमयी साई प्रतिष्ठाण, शिवबा प्रतिष्ठाण, भिमतेज तरुण मंडळ, 108 नंबरची रुग्णवाहीका मदतीसाठी धावून आल्या.  

COMMENTS