Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

समृद्धीवरील अपघातात चौघांचा मृत्यू

मृतांमध्ये शिर्डीतील चार जणांचा समावेश

अहमदनगर/प्रतिनिधी : राज्यात समृद्धी महामार्गावर होणार्‍या अपघातांची मालिका सातत्याने सुरूच असून, ही मालिका काही थांबण्याची चिन्हे नाहीत. बुलडाण्य

वांद्रे-वरळी सीलिंकच्या टोलनाक्यावर भीषण अपघात
पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या दोघांना गाडीने चिरडले .
दिल्ली-मुंबई महामार्गावरील अपघातात दोघांचा मृत्यू

अहमदनगर/प्रतिनिधी : राज्यात समृद्धी महामार्गावर होणार्‍या अपघातांची मालिका सातत्याने सुरूच असून, ही मालिका काही थांबण्याची चिन्हे नाहीत. बुलडाण्याजवळ झालेल्या अपघाताची घटना ताजी असतांनाच, रविवारी मध्यरात्री पुन्हा एकदा कारचा अपघात झाला असून, यातच चौघांचा मृत्यू झाला आहे. नाशिकच्या सिन्नरमधील मार्गावर कारचा अपघात झाला आहे. मुंबईहून शिर्डीच्या दिशेने निघालेली भरधाव कार दुभाजकाला धडकल्याने चार प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.
गेल्या काही दिवसांपासून सातत्याने अपघात होत असल्याने हा महामार्ग अपघातांचे केंद्र बनत चालल्याची चर्चा आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मृत प्रवाशांना सिन्नर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चार प्रवासी मुंबईहून नाशिकच्या दिशेने येत होते. मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास समृद्धी महामार्गावरील सिन्नर तालुक्यातील खापराळे शिवारात घोटी शिवारात चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर कार महामार्गाच्या मध्यभागी दुभाजकावर जाऊन आदळली. त्यात चार प्रवाशांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर चार अन्य प्रवासी जखमी झाले आहे, त्यांच्यावर सिन्नर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. या अपघातात रज्जाक अहमद शेख (वय 55), सत्तार शेखलाल शेख (वय 65), सुलताना सत्तार शेख (वय 50) हे जागीच ठार झाले. तर, फैयाज दगुभाई शेख (वय 40) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जुबेर रज्जाक शेख (वय 35), मैरूनिसा रज्जाक शेख (वय 45), अझर बालन शेख (वय 25) मुस्कान अजहर शेख (वय 22) हे गंभीर जखमी झाले. यातील काही जखमी शिर्डी येथील सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल तर काही नाशिक येथे उपचारासाठी पाठवण्यात आले आहेत. मयत आणि जखमी सर्व शिर्डी येथील रहिवासी असून एकमेकांचे नातलग आहेत. कार अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याने नाशिकमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. काही दिवसांपूर्वीच बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर भीषण अपघातात पाच प्रवाशांना जीव गमवावा लागला होता. त्यानंतर सिंदखेडराजा येथेही अवजड वाहनाला भीषण अपघात झाला होता. त्यानंतर आता नाशिकजवळ समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाल्याने हळहळ व्यक्त केली जातेय. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरू असल्याने चालक महामार्गावरून वाहन चालवण्यास घाबरत आहे. त्यामुळं आता समृद्धी महामार्गावरील अपघातांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

कटरने कारचे दरवाजे कापून काढले जखमींना – अपघाताची तीव्रता इतकी भयावह होती की, पोलिस उपअधीक्षक प्रदीप मौराळे यांच्या मार्गदर्शनाखाली महामार्ग पोलिस सिन्नर केंद्राचे सहायक पोलीस निरीक्षक शशिकांत गिरी, महाराष्ट्र सुरक्षा पथक, जलद प्रतिसाद पथक समृध्दी महामार्ग यांनी जलद घटनास्थळी जात इनोव्हा कारचे दरवाजे कटरने कापून मयत आणि जखमींना कारमधून बाहेर काढले. मयतांना सिन्नरच्या ग्रामीण रुग्णालयात तर जखमींना तातडीने रुग्णवाहिकेच्या साह्याने उपचारासाठी रवाना करण्यात आले. अपघात ग्रस्त वाहन घटनास्थळावरून हटवून वाहतूक सुरळीत करण्यात आली.

COMMENTS