Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

यवतमाळ-अमरावती मार्गावरील अपघातात चौघांचा मृत्यू

अमरावती : लग्न सोहळ्यावरून परतत असलेल्या कार व बसची समोरासमोर भीषण धडक झाली. यामध्ये चार जण जागीच ठार झाले. तर, अन्य काही जण गंभीर जखमी झाले आहेत

कंटेनरने एकाच कुटुंबातील 5 जणांना चिरडले
देवदर्शन करुन परतताना ऑटोला ट्रकची धडक, एकाच कुटूंबातील चौघांचा मृत्यू
समृद्धीवरील अपघातात माजी रणजीपटूचा अपघात

अमरावती : लग्न सोहळ्यावरून परतत असलेल्या कार व बसची समोरासमोर भीषण धडक झाली. यामध्ये चार जण जागीच ठार झाले. तर, अन्य काही जण गंभीर जखमी झाले आहेत. रविवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास यवतमाळ अमरावती मार्गावर लोणी येथे हा भीषण अपघात घडला. मिळालेल्या माहितीनुसार, गावंडे, चौधरी व इंगोले कुटुंब हे 3 डिसेंबर रोजी लग्न सोहळ्यानिमित्त अमरावतीमधील नांदगाव खंडेश्‍वर येथे कारने गेले होते. त्यानंतर आज सकाळी अमरावती येथे देवीचे दर्शन घेऊन यवतमाळकडे परत येत असताना विरुद्ध दिशेने जात असलेल्या एसटीने त्याला समोरून जोरदार धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता की, यामध्ये वाहनातील चौघांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये रजनी अशोक इंगोले (वय 47), राधेश्याम अशोक इंगोले (27), वैष्णवी संतोष गावंडे ( 22), सारिका प्रमोद चौधरी अशी मृतांची नावे आहेत. सर्वजण यवतमाळ तसेच वाशिम जिल्ह्यातील कनेरगाव येथील रहिवासी आहे. याशिवाय अपघातात साक्षी प्रमोद चौधरी ( वय 17), प्रमोद पांडुरंग चौधरी (वय 45), सविता संतोष गावंडे, सचिन नारायण शेंद्रे आणि धनंजय माधव मिटकरे हे जखमी झाले आहेत.

COMMENTS