Homeताज्या बातम्यादेश

दोन सख्ख्या बहिणींसह चार मैत्रिणींनी घेतले विष; दोघींचा मृत्यू

औरंगाबाद येथील घटनेने खळबळ

पटना प्रतिनिधी : दोन बहिणींसह 18 ते 20 वयोगटातील चार मुलींनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार बिहारमधील औरंगाबाद येथे घडला आहे. या प

नवदाम्पत्याने विष प्राशन करून आत्महत्या
डोकेदुखीला कंटाळून 21 वर्षीय मुलीची आत्महत्या
शेततळ्यात उडी मारुन शिपायाची आत्महत्या

पटना प्रतिनिधी : दोन बहिणींसह 18 ते 20 वयोगटातील चार मुलींनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार बिहारमधील औरंगाबाद येथे घडला आहे. या प्रकारानंतर दोघींचा मृत्यू झाला असून दोघींवर गया येथील रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहेत. यातील दोघांचा मृत्यू झाला आहे. तसेच दोन जण गया येथील रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोघी बहिणींनी पहिल्यांदा विष घेतले. त्यानंतर त्यांच्या दोन मैत्रिणींनी देखील त्यांच्या पाठोपाठ विष घेतले.

कोणत्या कारणावरून दोन्ही बहिणींनी घरात विष घेतले. ही माहिती मिळताच त्यांच्या दोन मित्रीणींनी देखील विष घेतले. चारही मुलींची प्रकृती खालावल्याने त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर चौघांना गया येथील अनुग्रह नारायण मगध वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (एएनएमएमसीएच) पाठविण्यात आले.

दोन बहिणींपैकी एका बहिणीचा रविवारी गयायेथील एएनएमएमसीएचमध्ये नेत असताना मृत्यू झाला. सोमवारी त्यांच्या एका मैत्रिणीचा याच रुग्णालयात मृत्यू झाला. औरंगाबादचे उपविभागीय पोलीस अधिकारी मोहम्मद अमानुल्लाखान यांनी सांगितले की, मुलींच्या कुटुंबीयांची चौकशी केली जात आहे. मुलींच्या या कृत्यामागचे कारण जाणून घेण्यासाठी आम्ही त्यांच्या प्रकृतीची वाट पाहत आहोत. सध्या ते माहिती देण्याच्या स्थितीत नाहीत, असेही खान यांनी स्पष्ट केले.

COMMENTS