Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अक्कलकोटमध्ये भीषण अपघातात चार भाविकांचा मृत्यू

सोलापूर : नववर्षानिमित्त अक्कलकोट दर्शन घेऊन गाणगापूरकडे निघालेल्या भाविकांच्या गाडीला बुधवारी भीषण अपघात झाला. या अपघातात चार भाविकांचा मृत्यू झ

बेलवडे विकास सेवा सोसायटी निवडणूकीत सत्तांतर
माणसाने विनोदी असणं हे जिवंत पणाचे लक्षण; डॉ मिर्झा रफी अहमद बेग
घरगुती गॅस ग्राहकांनी त्वरीत ई-केवायसी करून घ्यावे

सोलापूर : नववर्षानिमित्त अक्कलकोट दर्शन घेऊन गाणगापूरकडे निघालेल्या भाविकांच्या गाडीला बुधवारी भीषण अपघात झाला. या अपघातात चार भाविकांचा मृत्यू झाला असून सात ते आठ जण जखमी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. स्कार्पिओ गाडीने ट्रकला धडक दिल्याने हा अपघात झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना मैंदर्गीजवळ घडली. मृतांमध्ये दोन पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार अक्कलकोट श्री स्वामी समर्थ दर्शन घेऊन गणगापूरला जात असताना मैंदर्गीजवळ हा भीषण अपघात झाला आहे. भाविकांच्या गाडीला एका दुसर्‍या वाहनाने समोरून जोरदार धडक दिली. या धडकेत चौघे जण जागीच ठार झाले आहे. तर 7 ते 8 जण जखमी झाले आहेत. मृत व जखमी भाविक हे स नांदेड जिल्ह्यातील असल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघातस्थळी अक्कलकोट पोलिस दाखल झाले आहे. त्यांनी जखमीना तातडीने अक्कलकोट सार्वजनिक रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. नांदेड येथून भविकांचा एक गट हा अक्कलकोट आणि त्यानंतर गाणगापूरला दर्शनासाठी जात होता. नवीनवर्ष देव दर्शनाने हे सर्व जण साजरे करण्यात होते. मात्र, त्यांच्यावर काळाने घाला घातला आहे.

COMMENTS