Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

काँग्रेस सेवादलाचे संस्थापक डॉ. नारायण हार्डीकर यांना अभिवादन

लातूर प्रतिनिधी - काँग्रेस सेवादलाचे संस्थापक डॉ. नारायण सुब्बाराव हार्डीकर यांच्या जयंतीनिमित्त दि. 7 मे रोजी लातूर शहर जिल्हा काँग्रेस सेवादल

सिडको  हडको  परिसरासह  ग्रामीण भागात रमजान ईद ऊत्साहात साजरी..
लातूर जिल्हा माहेश्वरी सभेच्या अध्यक्षपदी प्रकाश कासट
पावसाळ्यापूर्वी सोलापूरकरांच्या हक्काच्या पाण्याचा प्रश्न सोडवा अन्यथा जनआंदोलन करू- शिवसेना  जिल्हा संपर्कप्रमुख  शिवाजी सावंत 

लातूर प्रतिनिधी – काँग्रेस सेवादलाचे संस्थापक डॉ. नारायण सुब्बाराव हार्डीकर यांच्या जयंतीनिमित्त दि. 7 मे रोजी लातूर शहर जिल्हा काँग्रेस सेवादल व जिल्हा काँग्रेस सेवादलातर्फे डॉ. नारायण सुब्बाराव हार्डीकर यांना लातूरच्या काँग्रेस भवन येथे अभिवादन करण्यात आले. तसेच मागच्या आठवड्यात निधन झालेले प्रदेश सचिव सचिन क्षीरसागर यांना श्रद्धांजली देण्यात आली. यावेळी लातूर जिल्हा काँग्रेस सेवादल अध्यक्ष रमेश सूर्यवंशी, लातूर शहर जिल्हा काँग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष सुपर्ण जगताप, सेवादल चाकुर तालुका अध्यक्ष अ‍ॅड. धनंजय कोरे, प्रदेश सचिव धनराज टेकाळे, सेवादलाचे शहर उपाध्यक्ष अ‍ॅड. सुनील गायकवाड, सेवादलाचे इसरार पठाण, डॉ. बी. आर. पाटील, अ‍ॅड. देविदास बोरुळे-पाटील, यंग ब्रिगेडचे मुनव्वर शेख, सेवादल मिडीयाचे प्रा. एम. पी. देशमुख, अब्दुल्ला शेख, कैलाश माने, सामाजिक न्याय कमिटीचे प्रा. शिवाजी मोहाळे, सरचिटणीस सपकाळ, नितिन माने, यंग ब्रिगेडचे सुर्योदय बोइनवाड, प्रशांत पवार, कलीम शेख, शहर सेवादल सचिव रहीम शेख, अ‍ॅड. सुर्यवंशी, प्रमोद जोशी यांच्यासह काँग्रेस सेवादलाचे विविध पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते. याप्रसंगी जिल्हा अध्यक्ष रमेश सुर्यवंशी, डॉ. बी. आर. पाटील, देशमुख, प्रा. शिवाजी मोहाळे, अ‍ॅड. धनंजय कोरे, धनराज टेकाळे, इसरार पठाण यांनी डॉ. नारायण सुब्बाराव हार्डीकर यांच्याविषयी अभिवादनपर मनोगत व्यक्त केले व मागील आठवड्यात निधन झालेले प्रदेश सचिव सचिन क्षीरसागर यांना आदरांजली अर्पण केली. डॉ. नारायण सुब्बाराव हार्डीकर यांच्या कार्याचा उजाळा मांडताना लातूर शहर जिल्हा काँग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष सुपर्ण जगताप म्हणाले की, भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील सेवादलाचे योगदान हे प्रत्येक काँग्रेसच्या कार्यकर्त्याला माहीत असावे. डॉ. नारायण सुब्राबाव हार्डीकर यांचा जन्म 7 मे 1889 साली धारवाड कर्नाटक येथे झाला होता. भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये काँग्रेसचे ते प्रमुख नेते होते. भारतीय स्वातंत्र्य संग्रामाच्या काळात त्यांनी ‘हिंदुस्तान सेवादल’ ची स्थापना केली होती. आज ती भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सेवादल म्हणून ओळखली जाते. बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर डॉ. हार्डीकर हे 1913 साली पुढील शिक्षणासाठी अमेरिकेला गेले तेथे मिशिगन युनिव्हर्सिटीमध्ये त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील प्रसिद्ध राष्ट्रीय नेते लाला लजपतराय हे त्यावेळेस अमेरिकेतच होते. भारताच्या स्वातंत्र्य लढ्याच्या दृष्टीने वातावरण तयार करण्यासाठी ‘हिंदुस्तान असोसिएशन ऑफ अमेरिका’ नावाची एक संस्था त्यावेळी तेथे काम करत होती. त्यामुळेच डॉ. नारायण सुब्बाराव हार्डिकर हे भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा विचार घेऊन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मायदेशी भारतात परतले आणि कर्नाटकमधील तरुणांमध्ये राष्ट्रीय भावना, राष्ट्रप्रेमाचे विचार रुजण्यासाठी 1923 मध्ये हिंदुस्तान सेवा दलाची स्थापना केली. देशभर फिरुन त्यांनी हिंदुस्तान सेवादलाचा विस्तार केला. हिंदुस्तान सेवादलाचे भारतीय स्वातंत्र्य लढ्यामधील योगदान कधीच विसरणार नाही.

COMMENTS