Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

स्पर्धा परीक्षांचा पाया शिष्यवृत्ती परीक्षा

तहसीलदार सिद्धार्थ मोरे यांचे प्रतिपादन

अकोले ः स्पर्धा परीक्षांचा पाया हा शिष्यवृत्ती परीक्षा असून जीवनात अधिकारी होण्यासाठी या परीक्षा अतिशय महत्त्वाच्या आहे. कळस शाळेचे यश हे उत्तुंग

रस्ता खुला करण्यासाठी तहसिलसमोर शेतकर्‍यांचे उपोषण
विद्यार्थ्यांसाठी सीएसएमएस सहा महिन्यांचा मोफत कोर्स – शिंदे
कोल्हे यांनी जखमी युवकाला केली मदत

अकोले ः स्पर्धा परीक्षांचा पाया हा शिष्यवृत्ती परीक्षा असून जीवनात अधिकारी होण्यासाठी या परीक्षा अतिशय महत्त्वाच्या आहे. कळस शाळेचे यश हे उत्तुंग असून यातून भावी पिढीचे अधिकारी घडतील अशी प्रतिपादन अकोल्याचे तहसीलदार सिद्धार्थ मोरे यांनी व्यक्त केले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कळस बु या शाळेचे शिष्यवृत्ती परीक्षेत आठ विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत आले बद्दल सत्कार आयोजित करण्यात आला होता त्यावेळी मोरे हे बोलत होती.
यावेळी अकोले पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक गुलाबराव पाटील कळस सोसायटीचे चेअरमन विनय वाकचौरे, जयकिसान दूध संस्थेचे चेअरमन भाऊसाहेब वाकचौरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक ईश्‍वर वाकचौरे, शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य नामदेव निसाळ, तलाठी सागर लांडे, कामगार पोलीस पाटील गोपीनाथ ढगे, डी. टी. वाकचौरे, भाऊसाहेब वाकचौरे दीपक वाकचौरे आदि उपस्थित होते. अधिकारी होण्यासाठी खूप मेहनत करावी लागते, जीवनात संस्काराला पण महत्व दिले पाहिजे या संस्कारातून विद्यार्थी घडले पाहिजे, अशी संस्कार संपिडी घडवण्याचं काम कळस शाळेमध्ये होत आहे ही कौतुकास्पद बाब आहे येथील शिक्षक अतिशय मेहनत घेऊन विद्यार्थ्यांना सर्वांगीण शिक्षण देत आहे हे असे मत तहसीलदार मोरे यांनी व्यक्त केले. पी.आय. गुलाबराव पाटील यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना भावी कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. शाळेचे विद्यार्थी वेदिका विवेक वाकचौरे, ज्ञानदा प्रशांत वाकचौरे, अरुंधती सुहास कातोरे, गौरी विष्णू वाकचौरे, पूर्वा विकास वाकचौरे, विराज जयराम वाकचौरे, यश योगेश वाकचौरे, ईश्‍वरी प्रशांत हुजबंद हे विद्यार्थी व मार्गदर्शन करणार्‍या वर्गशिक्षिक सुवर्णा जाधव मोहिते, संपत भोर यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक मुख्याध्यापिका संगीता दिघे यांनी तर आभार सपना पांडे यांनी मानले.

COMMENTS