Homeताज्या बातम्यादेश

माजी केंद्रीय मंत्री शरद यादव यांचे निधन

नवी दिल्ली : संयुक्त जनता दलाचे (जेडीयू) माजी अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री शरद यादव यांचे निधन झाले. मृत्यूसमयी ते 75 वर्षांचे होते. त्यांच्य

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सल्फर, ऑक्सिजन असल्याचे पुरावे; इस्त्रोने दिली मोठी अपडेट
Crime Alert : पत्नीचा खून करून पती झाला फरार…
जवान सिनेमाचं पहिलं रोमँटीक गाणं रिलीज

नवी दिल्ली : संयुक्त जनता दलाचे (जेडीयू) माजी अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री शरद यादव यांचे निधन झाले. मृत्यूसमयी ते 75 वर्षांचे होते. त्यांच्या कन्या सुभाषिनी यादव यांनी ट्विट करत शरद यादव यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला.देशाच्या राजकारणात वेगळे स्थान निर्माण करणार्‍या यादव यांचा जन्म 1 जुलै 1947 रोजी मध्यप्रदेशच्या होशंगाबाद जिल्ह्यातील बंदाई गावातल्या एका शेतकरी कुटुंबात झाला होते. लहानपणापासून ते अतिशय कुशाग्र बुद्धीमत्तेचे विद्यार्थी होते. शालेय शिक्षणानंतर त्यांनी जबलपूरच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातून इंजिनीअरिंगची पदवी संपादित केली होती. शरद यादव यांची जन्मभूमी मध्यप्रदेश असली तरी त्यांनी  बिहारच्या राजकारणात वेगळे स्थान निर्माण केले होते. जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनातून यादव यांचे राजकीय उत्थान झाले होते. समाजवादी राजकारणातील प्रमुख चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. त्यांच्या विचारशैलीमुळे ते जनतेत लोकप्रिय झाले होते.

COMMENTS