श्रीलंका प्रतिनिधी - श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू सचित्र सेनानायकेला मॅच फिक्सिंगच्या आरोपाखाली बुधवारी अटक करण्यात आली. सकाळी शरणागती पत्करल्या

श्रीलंका प्रतिनिधी – श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू सचित्र सेनानायकेला मॅच फिक्सिंगच्या आरोपाखाली बुधवारी अटक करण्यात आली. सकाळी शरणागती पत्करल्यानंतर क्रीडा भ्रष्टाचार तपास पथकाने त्याला अटक केली. तीन आठवड्यांपूर्वी न्यायालयाने त्याला परदेशात जाण्यास बंदी घातली होती. सेनानायकेवर लंका प्रीमियर लीग 2020 मधील सामने फिक्स केल्याचा आरोप आहे ज्यामध्ये त्याने दोन खेळाडूंना सामना फिक्स करण्यासाठी प्रवृत्त केले होते सचित्र ने 2012 आणि 2016 च्या दरम्यान 49 एकदिवसीय आणि 24 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले. कोलंबोच्या मुख्य दंडाधिकारी न्यायालयाने सेनानायके यांच्यावर तीन महिन्यांच्या कालावधीसाठी प्रवासी बंदी घालण्याचे आदेश नियंत्रकांना दिले होते. क्रीडा मंत्रालयाच्या तपास पथकासमोर आत्मसमर्पण केल्यानंतर सचित्राला अटक करण्यात आली. सामना फिक्स करण्यासाठी माजी गोलंदाजाने फोनद्वारे दोन खेळाडूंशी संपर्क साधल्याचा आरोप आहे. गेल्या महिन्यात कोलंबोच्या मुख्य दंडाधिकारी न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू झाली. त्यानंतर सचित्र सेनानायके यांना देश सोडण्यास बंदी घालण्यात आली होती
COMMENTS