पंजाब- पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दलाचे ज्येष्ठ नेते प्रकाश सिंह बादल यांचं निधन झालं आहे. वयाच्या 95 व्या वर्षी त्यांनी अखे

पंजाब- पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दलाचे ज्येष्ठ नेते प्रकाश सिंह बादल यांचं निधन झालं आहे. वयाच्या 95 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून प्रकाश सिंह बादल यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्यानं हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. गेल्यावर्षीही त्यांना श्वसनाचा त्रास झाला होता. तसंच, कोव्हिडची लागणही त्यांना झाली होती. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रकाश सिंह बादल यांना श्रद्धांजली अर्पण केलीय. ट्वीट करत मोदींनी म्हटलंय की, “प्रकाश सिंह बादल यांचं निधन माझ्यासाठी वैयक्तिक हानी आहे. पंजाब राज्याच्या विकासासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले.
COMMENTS