नवी दिल्ली : भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे गुरूवारी रात्री भारतीय आयुर्विज्ञान संस्था अर्थात एम्समध्ये निधन झाले. त्यानंतर शनिवारी
नवी दिल्ली : भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे गुरूवारी रात्री भारतीय आयुर्विज्ञान संस्था अर्थात एम्समध्ये निधन झाले. त्यानंतर शनिवारी त्यांच्यावर दिल्लीतील निगमबोध घाटावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी तिन्ही सैन्यदलाने सलामी देत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मुलीने यावेळी त्यांना मुखाग्नी दिला. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, उपराष्ट्रपती जगदीप धनखड आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी त्यांची मोठी मुलगी उपिंदर सिंग (65), दुसरी मुलगी दमन सिंग (61) आणि तिसरी मुलगी अमृत सिंग (58) अंत्यसंस्काराला उपस्थित आहेत.
अंत्यसंस्काराच्या वेळीही मनमोहन सिंग यांना निळी पगडी घातली होती. फेंट निळा हा मनमोहन यांचा आवडता रंग आहे आणि त्यांना केंब्रिज विद्यापीठाच्या दिवसांची आठवण करून द्यायचा, म्हणूनच ते नेहमी निळा पगडी घालत असत. लष्कराच्या तोफखाना वाहनातून त्यांचे पार्थिव निगमबोध घाटावर आणण्यात आले होते. काँगे्रस नेते राहुल गांधी मृतदेहासोबत गाडीत बसले होते. सोनिया गांधी, प्रियंका गांधी आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते यावेळी निगमबोध घाटावर उपस्थित होते. त्यापूर्वी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मनमोहन यांना अखेरची श्रद्धांजली वाहिली. डॉ. मनमोहन यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी त्यांच्या निवासस्थानातून काँग्रेस मुख्यालयात आणण्यात आले होते. डॉ. सिंग यांच्या पत्नी गुरशरण कौर आणि मुलगी दमन सिंग यांनी काँग्रेस मुख्यालयात त्यांना श्रद्धांजली वाहिली. राहुल गांधी, सोनिया आणि प्रियंका यांच्याशिवाय काँग्रेसच्या इतर नेत्यांनी मनमोहन यांना अखेरचा निरोप दिला. डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर निगमबोध घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याने काँग्रेसने नाराजी व्यक्त केली आहे. केसी वेणुगोपाल म्हणाले माजी पंतप्रधानांचे स्मारक बांधण्यासाठी सरकारला जमीनही मिळू शकली नाही. हा देशाच्या पहिल्या शीख पंतप्रधानांचा अपमान आहे. खरे तर मनमोहन सिंग यांचे ज्या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले त्याच ठिकाणी स्मारक बांधले जावे, अशी मागणी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मोदी-शहा यांच्याकडे केली होती. मात्र, स्मारकाचे नेमके ठिकाण ठरवण्यासाठी काही दिवस लागू शकतात, असे गृहमंत्रालयाने रात्री उशिरा सांगितले.
COMMENTS