Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

माजी खासदार उल्हास पाटील भाजपच्या वाटेवर ?

जळगाव ः महाराष्ट्रात भाजप पुन्हा एकदा ऑपरेशन लोटस राबवत असल्याचे संकेत मिळत असतांना, काँगे्रस नेते मिलिंद देवरा यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंत

लातूरातील 13 शाळा ‘पीएम-श्री’ योजनेत; अनुभवात्मक पद्धतीने मिळणार भविष्यवेधी शिक्षण
जीवनात गुरुचे स्थान सर्वात महत्वाचे आहे – कवी माने
विद्युत  वितरणचा लहरी कारभार दीडशे गावे अंधारात

जळगाव ः महाराष्ट्रात भाजप पुन्हा एकदा ऑपरेशन लोटस राबवत असल्याचे संकेत मिळत असतांना, काँगे्रस नेते मिलिंद देवरा यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर आता काँगे्रसचे माजी खासदार डॉ. उल्हास पाटील भाजपच्या वाटेवर असून, ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे समोर आले आहे.
जळगाव जिल्ह्यातील रावेर मतदारसंघात लोकसभा निवडणुकीसाठी अनेक इच्छूक उमेदवार रिंगणात आहेत.  मागील 10 वर्षापासून निवडणूक लढण्यासाठी जोमाने तयारीला लागलेले काँग्रेसचे डॉ. उल्हास पाटील मात्र ही जागा राष्ट्रवादीकडे गेल्यामुळे नाराज झाले आहेत. जळगावचे माजी खासदार डॉ. उल्हास पाटील आणि त्यांच्या कन्या डॉ.केतकी पाटील या भाजपमध्ये बुधवारी प्रवेश करणार आहेत, अशी शक्यता वर्तवली जात आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडणार आहे. दरम्यान यामुळे राज्यात आणि जळगाव जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला मोठा फटका बसणार आहे. रावेर लोकसभा मतदारसंघात जळगाव जिल्ह्यामधील 5 व बुलडाणा जिल्ह्यामधील 1 असे एकूण 6 विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत. या मतदारसंघातून एकनाथ खडसे यांच्या सून रक्षा खडसे खासदार आहेत. तर एकनाथ खडसेंनी भाजप सोडत राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने रक्षा खडसेंना उमेदवारी मिळण्याची शक्यता धुसर झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. यातूनच केतकी पाटील आणि उल्हास पाटील यांना भाजप पक्षप्रवेश देत त्यांना उमेदवारी देण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. जिल्ह्यातील आत्ताचे दोन्ही रावेर व जळगाव लोकसभा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाचे गड आहेत. गेल्या तीन ते साडेतीन दशकांमध्ये या दोन्ही मतदारसंघात अपवाद वगळता भारतीय जनता पक्षाचे उमेदवार मोठ्या फरकाने निवडून आले आहेत.

COMMENTS