Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

माजी मंत्री मीनाक्षी पाटील यांचे निधन

मुंबई : शेतकरी कामगार पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या व राज्याच्या माजी मंत्री मीनाक्षी पाटील यांचे शुक्रवारी निधन झाले. त्या 76 वर्षांच्या होत्या. मीना

उदंरखेल साठवण तलावात बेवारस मृतदेह आढळला
चित्रपट पाहून सायको किलरने केल्या 4 सुरक्षारक्षकांच्या हत्या
X यूजर्ससाठी धक्का! पोस्ट करण्यासाठी मोजावे लागणार पैसे

मुंबई : शेतकरी कामगार पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या व राज्याच्या माजी मंत्री मीनाक्षी पाटील यांचे शुक्रवारी निधन झाले. त्या 76 वर्षांच्या होत्या. मीनाक्षी पाटील यांच्या निधनामुळे एक झुंजार नेतृत्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. मीनाक्षी पाटील या अलिबाग विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा आमदार होत्या. 1999 मध्ये तत्कालीन विलासराव देशमुख सरकारमध्ये त्या राज्यमंत्री म्हणून कार्यरत होत्या. शेकापचे नेते जयंत पाटील, माजी आमदार पंडित पाटील यांच्या त्या भगिनी होत. तर शेकाप नेते आस्वाद पाटील यांच्या त्या मातोश्री होत.

COMMENTS