Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

माजी मंत्री स्व. कोल्हे यांच्या जयंतीनिमित्त विविध सेवांचे लोकार्पण

कोपरगाव प्रतिनिधी ः माजी मंत्री स्व.शंकररावजी कोल्हे यांच्या 94 व्या जयंतीनिमित्त कोपरगाव शहरात अभिवादन करून विविध लोकोपयोगी उपक्रम भाजपा प्रदेश

शिक्षकांनी सर्वोत्कृष्ट बनून विद्यार्थ्यांच्या मनात जिद्द निर्माण केली पाहिजे : डॉ.सर्जेराव निमसे
प्रिय दीपाली चव्हाण, मीही लवकरच येतेय तुझ्या वाटेवर… महिला अधिकाऱ्याची सुसाईड नोट व्हायरल… l Lok News24
श्रीगोंद्यात 832 मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क

कोपरगाव प्रतिनिधी ः माजी मंत्री स्व.शंकररावजी कोल्हे यांच्या 94 व्या जयंतीनिमित्त कोपरगाव शहरात अभिवादन करून विविध लोकोपयोगी उपक्रम भाजपा प्रदेश सचिव मा.आ. स्नेहलता कोल्हे यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. कोपरगाव अमरधाम येथे संजीवनी उद्योग समूह व अष्टविनायक मित्र मंडळ यांच्या माध्यमातून प्रवचनकार बैठक कक्ष, विसावा ओटा,अस्थीकलश ठेवण्याचे कपाट यांचे लोकार्पण मा.आ.सौ.स्नेहलता कोल्हे व प्रजापिता ब्रम्हकुमारी कोपरगाव केंद्राच्या प.पूज्य सरलादीदी यांच्या हस्ते विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
स्व.कोल्हे यांच्या विचारांवर प्रेरित राहून अनेक कार्यकर्त्यांचे आयुष्य घडले.त्यांनी संस्कराशिल समाजकारण करून सर्वसामान्यांचे प्रश्‍न सोडविण्याचे काम केले. छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ माजी मंत्री स्व.कोल्हे यांना अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या ठिकाणी संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने नूतन वैकुंठ रथ लोकार्पण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. स्व.शंकररावजी कोल्हे यांच्या जीवनाचा सेवा हा मूलमंत्र राहिला.त्यांनी आमच्यावर सेवेचे संस्कार केले जे मी आयुष्यात रक्ताच्या शेवटच्या थेंबा पर्यंत जपून साहेबांचा वसा पुढे नेणार आहे.जी माणसे त्यांनी आयुष्यभर जोडली ती आमचे कुटूंबीयच आहेत असे मानून त्यांना आमचे कोल्हे कुटूंब कधीही अंतर देणार नाही.माणूस जिवंत असे पर्यंत सर्वच विचारपूस करतात पण एखादा माणूस निधन झाल्यानंतर त्या कुटूंबाला त्या व्यक्तीला अखेरचा निरोप देतांना येणार्‍या अडीअडचणी ओळखून त्यात हातभार लागावा अशी भावना ठेऊन विविध सेवांचे लोकार्पण आज करण्यात आले आहे.अनेक युवकांनी किराणा किट,कार्यकर्त्यांनी स्वयंप्रेरनेने अनेक समाजोपयोगी कार्यक्रम आयोजित करून साहेबांना अभिवादन केले.वेळ कोणतीही असो आपण समाजासाठी कार्य करायचे हा स्व.कोल्हे साहेबांचा संस्कार या प्रकारे नेहमी तेवत राहील अशी भावना स्नेहलता कोल्हे यांनी व्यक्त केली आहे.
या प्रसंगी दिलीप दारुणकर, बाळासाहेब नरोडे, शरदनाना थोरात, पराग संधान, दत्तात्रय काले, रवींद्र पाठक, राजेंद्र सोनवणे ,योगेश बागुल ,अतुल  काले, विजय आढाव, उद्धव विसपुते,जितेंद्र रणशूर, बबलू वाणी, विनोद राक्षे, अशोक लकारे, संजय जगदाळे, गणेश आढाव, संदीप देवकर ,उल्हास  पवार ,कैलास जाधव ,राजेंद्र बागुल, सौ.वैशाली आढाव, सौ. विद्या सोनवणे, सौ. शोभा पवार, सौ. विजया देवकर,सौ.सुवर्णा सोनवणे, विजय वाजे, स्वप्नील निखाडे , जनार्दन कदम, अल्ताफ कुरेशी, दिनेश कांबळे ,अविनाश पाठक, वैभव आढाव ,रवींद्र रोहमारे, गोपीनाथ गायकवाड ,राजेंद्र लोखंडे ,नरेंद्र डंबिर ,राहुल सूर्यवंशी ,मनील नरोडे ,विनोद गलांडे ,खालिक कुरेशी, जगदीश मोरे ,विक्रमादित्य सातभाई, प्रसाद आढाव, पप्पू पडियार, रंजन जाधव,सतीशराव रानोडे,हशमभाई पटेल,महेश खडमकर, किरण सुपेकर, विष्णुपंत गायकवाड,दादाभाऊ नाईकवाडे,रवींद्र सोमासे, जयेश बडवे,दीपक जपे, भानुदास कुहिले, संतोष नेरे ,अनिल गोडसे, बंटी पांडे,सलीम पठाण, बाळासाहेब राऊत, बाळासाहेब मंडलिक, स्वप्निल कडू,मुसाभाई मुलानी, समीर सुपेकर,काका पुरंदरे, बाळासाहेब राक्षे, मुख्तार शेख, नंदू वायडे, नरेंद्र जाधव, आशिष उदावंत,मुख्तार शेख आदिंसह भाजपा,शिवसेना मित्रपक्षांसह विविध संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

COMMENTS