Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

माजी मंत्री बाळासाहेब पाटील इचलकरंजी महापालिकेचे निवडणूक प्रभारी

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्षांकडून घोषणाकराड / प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष, मा

सन 1978 ची पुनरावृत्ती करत इतिहास घडवा : गौरव नायकवडी यांचे आष्टा येथे आवाहन
तामकणेच्या नाथ मंदीराच्या कामासाठी मदतीचे आवाहन
महिला शिक्षकांना त्रास देणार्‍या गटशिक्षणाधिकार्‍यांवर कारवाई करावी : नंदकुमार गोडसे

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्षांकडून घोषणा
कराड / प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष, माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्यावर महापालिका निवडणुकांसाठी पक्षाने कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी महापालिकेच्या निवडणूक प्रभारी पदाची जबाबदारी सोपवली आहे. प्रदेशाध्यक्ष आ. शशिकांत शिंदे यांनी याबाबतची घोषणा केली आहे.
राज्यात नगरपालिका व नगरपंचायतींच्या निवडणुका झाल्यानंतर महापालिका निवडणुकांचा निवडणूक कार्यक्रम सुरू झाला आहे. एकूण 29 महापालिकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निवडणूक प्रभारी यांची घोषणा केली आहे. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी महापालिकेचे निवडणूक प्रभारी म्हणून माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांची निवड केली आहे.
बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली नुकतीच सातारा जिल्ह्यातील कराड नगरपालिकेची निवडणूक त्यांनी जिंकली आहे. त्यानंतर इचलकरंजी महापालिकेच्या निवडणूक प्रभारी पदाची जबाबदारी बाळासाहेब पाटील यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
या निवडीबद्दल पक्षाचे अध्यक्ष खा. शरद पवार, खा. सुप्रिया सुळे, माजी मंत्री आ. जयंत पाटील, आ. शशिकांत शिंदे यांनी त्यांचे अभिनंदन केले.

COMMENTS