मुंबई : रतन टाटा यांचे निकटवर्तीय आणि टाटा सन्सचे माजी संचालक आर.के. कृष्णकुमार यांचे रविवारी मुंबईत निधन झाले. ते 84 वर्षांचे होते. हृदयविकाराच्
मुंबई : रतन टाटा यांचे निकटवर्तीय आणि टाटा सन्सचे माजी संचालक आर.के. कृष्णकुमार यांचे रविवारी मुंबईत निधन झाले. ते 84 वर्षांचे होते. हृदयविकाराच्या झटक्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आल्याचे टाटा समुहाकडून सांगण्यात आले.
टाटा सन्समध्ये 66 टक्के हिस्सा असलेल्या सर दोराबजी टाटा ट्रस्ट आणि सर रतन टाटा ट्रस्टचे ते विश्वस्तही होते. त्यांनी टाटा ग्रुपमध्ये मोठं योगदान दिले. चहाला देखील जगात दुसर्या क्रमांकावर आणले. त्यानंतर ते 2013 पर्यंत ते इंडियन हॉटेल्सचे उपाध्यक्षही होते. 2009 मध्ये केंद्र सरकारने कृष्णकुमार यांना पद्मश्री हा चौथा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन त्यांच्या उद्योगातील योगदानाबद्दल सन्मानित केले होते. कृष्णकुमार यांचा जन्म केरळमध्ये झाला होता. त्यांचे पूर्ण नाव रायारोथ कुट्टुंबळ्ळी कृष्ण कुमार होते. त्यांनी 1963 मध्ये चेन्नईतील प्रेसिडेन्सी कॉलेज सोडले आणि टाटा समूहात प्रवेश केला. त्यांची पहिली पोस्टिंग टाटा इंडस्ट्रीजमध्ये झाली होती आणि तिथून त्यांनी टाटा ग्लोबल बेव्हरेजेस, इंडियन हॉटेल्स आणि टाटा सन्स या टाटाच्या अनेक संस्थांबरोबर काम केले.
रतन टाटांनी केला शोक व्यक्त- कृष्णकुमार यांच्या निधनानंतर रतन टाटा यांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटले की, माझे मित्र आणि सहकारी आर.के. कृष्णकुमार यांच्या निधनाने मला झालेली हानी शब्दात मांडता येणार नाही. आम्ही ग्रुपमध्ये आणि वैयक्तिकरित्या एकत्रित केलेला व्यवहार मला नेहमी लक्षात राहील. ते टाटा समूह आणि टाटा ट्रस्टचे खरे दिग्गज होते आणि सर्वांनाच त्यांची आठवण येईल.
COMMENTS