Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विधानसभेचे माजी उपसभापती मोरेश्‍वर टेमुर्डे यांचे निधन

चंद्रपूर/प्रतिनिधी ः राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते चंद्रपूरमधील वरोरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार अ‍ॅड. मोरेश्‍वर टेमुर्डे यांचे 82 व्या

सा. बा. मंत्री अशोक चव्हाणांची बदनामी ! l LokNews24
शिर्डी येथे ‘महापशुधन एक्सपो’ चे २४ ते २६ मार्च दरम्यान आयोजन
मुख्यमंत्री शिंदेंना धमकी देणारा पोलिसांच्या ताब्यात

चंद्रपूर/प्रतिनिधी ः राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते चंद्रपूरमधील वरोरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार अ‍ॅड. मोरेश्‍वर टेमुर्डे यांचे 82 व्या वर्षी निधन झाले. वरोरा येथे राहत्या घरी झोपेतच ह्रदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. निधनाची बातमी कळताच राजकीय क्षेत्रात शोककळा पसरली आहे. मोरेश्‍वर टेमुर्डे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय मानले जात होते. राष्ट्रवादीत आणि राज्याच्या राजकारणात एकनिष्ठ आणि प्रामाणिक व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ख्याती होती.

COMMENTS