Homeताज्या बातम्यादेश

दिल्लीचे माजी मंत्री सत्येंद्र जैन व्हेंटिलेटरवर

नवी दिल्ली : भ्रष्टाचाराच्या आरोपात तिहार जेलमध्ये असलेले दिल्लीचे माजी मंत्री सत्येंद्र जैन यांची प्रकृती खालवली आहे. जैन यांना गुरूवारी दीनदयाल

पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमध्ये वाढ
वंचित फॅक्टरची निराशाजनक कामगिरी
देवेंद्र फडणवीस पोलिसांच्या ताब्यात |सुपरफास्ट २४ | LokNews24|

नवी दिल्ली : भ्रष्टाचाराच्या आरोपात तिहार जेलमध्ये असलेले दिल्लीचे माजी मंत्री सत्येंद्र जैन यांची प्रकृती खालवली आहे. जैन यांना गुरूवारी दीनदयाल उपाध्याय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या ते व्हेंटिलेटरवर आहेत. यापूर्वी देखील कारागृहातील बाथरूमध्ये घसरून पडल्यामुळे जैन यांच्या मणक्याला दुखापत झाली होती.
मनी लाँड्रिंग सत्येंद्र जैन यांना सक्तवसुली संचालनालयाने अटक केली आहे. कारागृहात जैन यांचे 35 किलो वजन घटल्याचा दावा त्यांच्या वकिलांनी न्यायालयातील सुनावणीत केला होता. सोमवारी त्यांना सफदरजंग हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते. तिथे मणक्याच्या आजाराबद्दल ओपीडीमध्ये सल्लामसलत केल्यानंतर त्यांना पुन्हा तिहार तुरुंगात नेण्यात आले. तुरुंग अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरूवारी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास सत्येंद्र जैन घसरले. त्याने दीनदयाल उपाध्याय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्राथमिक तपासणी करण्यात आली. पाठ, डावा पाय आणि खांदा दुखत असल्याच्या तक्रारीनंतर त्यांना डीडीयू रुग्णालयात पाठवण्यात आले.  

COMMENTS