Homeताज्या बातम्यामनोरंजन

माजी क्रिकेटपटू शोएब मलिक पुन्हा अडकला विवाहबंधनात

पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेद ही क्रिकेटपटू शोएब मलिकशी लग्न केल्याने चर्चेत आली आहे. सना व शोएब मलिकने लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे

दिल्ली येथील राष्ट्रीय तायक्वादो स्पर्धेत  लोह्याच्या वर्षा तोंडारेची कास्यपदाकाची कमाई
टी – २० वर्ल्डकपसाठी पंचांची घोषणा… भारताचा एकमेव पंच…
केकेआरचे प्ले ऑफकडे दमदार पाऊल

पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेद ही क्रिकेटपटू शोएब मलिकशी लग्न केल्याने चर्चेत आली आहे. सना व शोएब मलिकने लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. मागच्या अनेक दिवसांपासून भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा व शोएब मलिक यांच्या नात्यात सगळं आलबेल नसल्याची चर्चा होती. त्याबाबत या दोघांनी बोलणं टाळलं होतं. याच दरम्यान शोएबने थेट लग्नाचे फोटो शेअर केले आहेत.

शोएब मलिकने सना जावेदला इन्स्टाग्रामवर टॅग करत लग्नाचे दोन फोटो शेअर केले आहेत. त्यासोबतच ‘अलहमदुलिल्लाह’ असं कॅप्शन दिलंय. लग्नाचे फोटो चाहत्यांबरोबर शेअर केल्यानंतर सनाने तिच्या इन्स्टाग्रामवरील नावात मोठा बदल केला आहे. तिने तिचं सना जावेद हे नाव बदलून ‘सना शोएब मलिक’ असं केलं आहे. शोएब मलिकने लग्नाचे फोटो शेअर केल्यावर त्याच्या आणि सानिया मिर्झाच्या घटस्फोटावर शिक्कामोर्तब झालं आहे. सानिया अनेकदा घटस्फोटाबद्दल अप्रत्यक्ष भाष्य करणाऱ्या स्टोरीज शेअर करत असते, पण तिने नात्याबद्दल जाहीरपणे विधान केलं नव्हतं. आता शोएबने त्याच्या तिसऱ्या लग्नाचे फोटो शेअर केल्याने सानियाशी नातं संपल्याचं स्पष्ट झालं आहे.

COMMENTS