माजी पोलिस आयुक्त संजय पांडेंच्या अडचणी वाढल्या

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

माजी पोलिस आयुक्त संजय पांडेंच्या अडचणी वाढल्या

मुंबई/प्रतिनिधी : महाविकास आघाडी सरकारच्या अतिशय जवळचे समजले जाणारे मुंबईचे माजी पोलिस आयुक्त संजय पांडे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यांना यापूर्व

सर्व सौर योजनांच्या प्रकल्पांची अंमलबजावणी गतीने पूर्ण करावी : दत्तात्रय पडळकर
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला समतेचा विचार पुढे नेण्याचा निर्धार करुया : राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन
सातभाई व्होकेशनल ट्रेनिंग सेंटरची शंभर टक्के निकालाची परंपरा यंदाही कायम

मुंबई/प्रतिनिधी : महाविकास आघाडी सरकारच्या अतिशय जवळचे समजले जाणारे मुंबईचे माजी पोलिस आयुक्त संजय पांडे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यांना यापूर्वीच अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने समन्स बजावल्यानंतर शुक्रवारी सीबीआयने पांडे यांच्या संबंधित 10 ठिकाणी छापेमारी केली. त्यामुळे संजय पांडे यांच्या अडचणीत वाढ झाल्याचे बोलले जात आहे. संजय पांडेसह नॅशनल स्टॅाक एक्स्चेंजच्या माजी प्रमुख चित्रा रामकृष्ण आणि रवी नारायण यांच्याविरुद्ध देखील कारवाई सुरू करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नॅशनल स्टॅाक एक्स्चेंजच्या अधिकार्‍यांचे फोन टॅप केल्याप्रकरणी ही कारवाई केली जात आहे. यापूर्वी संजय पांडे यांना ईडीने समन्स जारी केला होता. पोलिस दलातून निवृत्त झाल्यानंतर अवघ्या तीन दिवसांतच संजय पांडे यांना ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयाने समन्स जारी केला होता. समन्स जारी करत ईडीने त्यांना 5 जुलै रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते. संजय पांडे 30 जून रोजी मुंबई पोलिस दलातून निवृत्त झाले. संजय पांडे हे डीजी पदावर असताना त्यांनी परमबीर सिंह यांना अनिल देशमुख यांच्याविरोधात माघार घेण्यासाठी दबाव निर्माण केला होता. तसेच एनएसई सर्वर कंप्रमाइज केस प्रकरणात त्यांना समन्स बजावण्यात आला होता. चित्र रामकृष्णा प्रकरणात एक ऑडिट कंपनी तयार करण्यात आली होती.ही कंपनी संजय पांडे यांची होती. हे प्रकरण आणि परमबीर सिंह या दोन्ही प्रकरणी संजय पांडे यांना ईडीने समन्स जारी केला आहे.

COMMENTS