हैदराबाद ः तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री आणि बीआरएस पक्षाचे प्रमुख के. चंद्रशेखर राव दुखापतग्रस्त झाले आहेत. पाय घसरून पडल्याने केसीआर यांच्या खुंब्

हैदराबाद ः तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री आणि बीआरएस पक्षाचे प्रमुख के. चंद्रशेखर राव दुखापतग्रस्त झाले आहेत. पाय घसरून पडल्याने केसीआर यांच्या खुंब्याला दुखापत झाल्याची माहिती आहे. त्यांना तातडीने उपचारासाठी यशोदा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गुरूवारी रात्री केसीआर यांच्या एररावल्लीच्या फार्महाऊसवर ही घटना घडली. केसीआर यांना रुग्णालयात दाखल केल्याचे वृत्त प्रसिद्ध होताच बीआरएसच्या नेत्यांनी तसेच आमदारांनी रुग्णालयाकडे धाव घेतली आहे. केसीआर यांची प्रकृती स्थिर असून त्यांचा खुंबा फ्रॅक्चर झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
COMMENTS