Homeताज्या बातम्यादेश

माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांचे निधन

कोलकाता ः पश्‍चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री आणि सीपीआयएमचे नेते बुद्धदेव भट्टाचार्य यांचे गुरूवारी वयाच्या 80 व्या वर्षी निधन झाले आहे. कोलकाता ये

 12 ही महिने पोलीस मैदान परिसरात भरते वटवाघुळांची शाळा
पर्यावरण संवर्धन जनजागृती सायकल महारॅलीला उत्स्फुर्त प्रतिसाद : मनोहर शिंदे
राज्यात आजपासून नवे फौजदारी कायदे लागू होणार

कोलकाता ः पश्‍चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री आणि सीपीआयएमचे नेते बुद्धदेव भट्टाचार्य यांचे गुरूवारी वयाच्या 80 व्या वर्षी निधन झाले आहे. कोलकाता येथील त्यांच्या घरी अखेरचा श्‍वास घेतला.
भट्टाचार्य वृद्धापकाळाशी संबंधित आजारांनी त्रस्त होते. त्यांना श्‍वास घेण्यासही त्रास होत होता. काही काळ त्यांना अनेकदा रुग्णालयात दाखल करावे लागले. गेल्या वर्षीही त्यांना न्यूमोनिया झाला होता. लाइफ सपोर्टवर राहिल्यानंतर तेव्हा ते बरे झाले होते. बुद्धदेव हे पश्‍चिम बंगालच्या औद्योगिक क्रांतीसाठी ओळखले जातात. त्यांच्या पश्‍चात पत्नी मीरा आणि मुलगी सुचेतना असा परिवार आहे. पद्मभूषण पुरस्कार स्वीकारण्यास नकार देणार्‍या बुद्धदेव भट्टाचार्य यांच्या निधनाबद्दल पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शोक व्यक्त केला आहे. बुद्धदेव भट्टाचार्य यांचा जन्म 1 मार्च 1944 रोजी उत्तर कोलकाता येथील बंगाली ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांचे आजोबा कृष्णचंद्र स्मृतीतीर्थ हे सध्याच्या बांगलादेशातील मदारीपूर जिल्ह्यातील रहिवासी होते. ते संस्कृत विद्वान, पुजारी आणि लेखकही होते. त्यांनी पुरोहित दर्पण नावाची एक पुरोहित पुस्तिका तयार केली जी पश्‍चिम बंगालमधील बंगाली हिंदू धर्मगुरूंमध्ये अजूनही लोकप्रिय आहे.

COMMENTS