Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वन औद्योगिक विकास महामंडळ स्थापन करणार

वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा

नागपूर/प्रतिनिधी ः राज्यात प्रथमच नागपूर आणि चंद्रपूर येथे वन औद्योगिक विकास महामंडळ अर्थात एफआयडीसी सुरू करण्याची घोषणा राज्याचे वनमंत्री सुधीर

भाजप आमदार मुक्ता टिळक यांचे निधन
पीएसआय व तलाठी परीक्षेतील गुणवतांचा गौरव
‘माफी मांगो राज ठाकरे…’

नागपूर/प्रतिनिधी ः राज्यात प्रथमच नागपूर आणि चंद्रपूर येथे वन औद्योगिक विकास महामंडळ अर्थात एफआयडीसी सुरू करण्याची घोषणा राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. 9 मार्च रोजी सादर होणार्‍या राज्याच्या अर्थसंकल्पात या संबंधात घोषणा केली जाणार असल्याचेही मुनगंटीवार म्हणाले.
मुनगंटीवार म्हणाले, राज्यात वन आधारित उद्योगांना चालना देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. टुथ पिक, अगरबत्तीसाठी लागणारी काडी याशिवाय फर्निचरसाठी लागणारे लाकूडही आपण आयात करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ’आत्मनिर्भर भारत’चा नारा दिला आहे. त्या दिशेने एक पाऊल म्हणून एफआयडीसी सुरू करणार आहोत. आर्थिक आणि औद्योगिक विकासात भर घालणार्‍या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) धर्तीवर हे महामंडळ सुरू करण्यात येणार आहे. उपजीविकेसाठी कृषी, वन आणि जल विभाग हे महत्वाचे आहे. मासेमारी आणि वनविभागावर उपजीविका चालते. नागपूर हे देशाच्या मध्यभागी आहे. वनविकास महामंडळ आणि वनविभाग मिळून दरवर्षी 600 ते 700 कोटी रुपयांची सागवान लाकडाची विक्री होते. त्याऐवजी तयार फर्निचर विकले जाईल. नागपूर येथे फर्निचरचे तर चंद्रपूर येथे वनौषधींचे सुविधा केंद्र (कॉमन फॅसिलिटी सेंटर) उभारण्यात येणार आहे. यासाठी केंद्र सरकार पैसा देते. या केंद्रांमध्ये नाममात्र दरात उद्योजकांना सुविधा देण्यात येईल व यासाठी लागणारी अत्याधुनिक उपकरणे आणि यंत्रे खरेदी करण्यात येईल असे मुनगंटीवार यांनी सांगितले. मुनगंटीवार म्हणाले, पर्यावरणावर आधारित औद्योगिक क्षेत्राकडे वळण्याची आज गरज आहे. वनौषधी आणि वनाधारित छोटे उद्योगाच्या दिशेने टाकलेले हे पहिले पाऊल आहे. वनाधारित समूह चंद्रपूर येथे असेल. चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात वनौषधीचा खजीना आहे. यासाठी आम्ही वैद्यनाथ, पतंजली, सांडू, डाबर यांच्याशी भागीदारी करणार आहोत. त्याचे प्रशिक्षण आदीवासी शेतकर्‍यांना देण्यात येईल ज्यातून त्यांनाही रोजगार मिळेल.

COMMENTS